Sugarcane Crushing Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season 2023 : राज्याचा गळीत हंगाम आजपासून

Sugarcane crushing : पश्‍चिम महाराष्ट्र वगळता राज्याच्या इतर भागांत हंगामास नियमित सुरुवात होईल अशी शक्यता आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : मंत्री समितीच्या निर्णयानुसार बुधवार (ता. १)पासून राज्यात ऊस तोडणी हंगामास सुरुवात होणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्र वगळता राज्याच्या इतर भागांत हंगामास नियमित सुरुवात होईल अशी शक्यता आहे. ‘स्वाभिमानी’सह इतर शेतकरी संघटनांच्या आक्रमक पवित्र्यामुळे विशेष करून पश्‍चिम महाराष्ट्रात मात्र हंगामाच्या प्रारंभीच संघर्षाची चिन्हे दिसत आहेत.

कमी ऊस उत्पादनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा ऊस हंगाम सुरू होत आहे. प्रत्येक वर्षी दिवाळीनंतर सुरू होणारा ऊस हंगाम यंदा उसाच्या अनुपलब्धतेमुळे व पाण्याच्या टंचाईमुळे पंधरा दिवस लवकरच सुरू होत आहे.

स्वाभिमानीसह इतर शेतकरी संघटनांनी मागील हंगामात गाळप झालेल्या उसास चारशे रुपये प्रति टन प्रमाणे द्यावेत या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून ऊस पट्ट्यात जोरदार आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत हे रक्कम मिळत नाही तोपर्यंत ऊस तोड सुरू करणार नाही, असा पवित्रा संघटनांनी घेतला आहे.

या पार्श्‍वभूमीवरच आजपासून ऊस तोडणी सुरुवात होत आहे. ऊसपट्ट्यातील अनेक गावांनी जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत ऊसतोड घ्यायची नाही, असा निर्णय घेतला आहे. या परिस्थितीत कारखाने कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष आहे.

अनेक कारखान्यांनी यंदाची एफआरपी जाहीर केली असली, तरी गेल्या हंगामातील रकमेबाबत कोणतेच भाष्य केले नाही यामुळे शेतकरी संघटनांमध्ये संतप्त भावना आहे. गळीत हंगाम प्रारंभाच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता. ३१) पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्यानी ऊस तोडणीसाठी तयारी ठेवली आहे.

ऊसतोडी रोखण्याचा इशारा...

तोडणी मजुरांना ऊस तोडणीचा कार्यक्रमही दिला आहे. तर काही कारखान्यांनी पोलिस बंदोबस्तात ऊस तोडणी करण्याची तयारी सुरू केली आहे. जिथे ऊस तोडी सुरू होतील तिथे रोखण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT