Sugarcane Season : गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी ‘वसाका’ची चाके पुन्हा गाळात

Sugarcane Crushing Season : विठेवाडी येथील वसाकाची चाके यंदा पुन्हा बंद पडण्याच्या मार्गावर असून, कराराने दिलेल्या धाराशिव कारखाना व्यवस्थापनाने कारणे देत कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon

Nashik News : विठेवाडी येथील वसाकाची चाके यंदा पुन्हा बंद पडण्याच्या मार्गावर असून, कराराने दिलेल्या धाराशिव कारखाना व्यवस्थापनाने कारणे देत कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

तशी नोटीस व्यवस्थापनाने कामगारांना पाठवली होती. मात्र याबाबत कामगार अनभिज्ञ असल्याने सर्वत्र संभ्रम आहे. यामुळे सभासद, ऊस उत्पादक व कामगार यांच्यापुढे पुन्हा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

कसमादेचे वैभव म्हणून ओळखला जाणारा वसंतदादा सहकारी साखर कारखाना (वसाका) हा या भागातील प्रमुख उत्पादक केंद्र मानला जातो. कळवण, देवळा, बागलाण, मालेगाव आणि चांदवड अशा तालुक्यांतील २८९ गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या वसाकाने सहकाराच्या उमेदीत आपला वेगळा ठसा उमटवून अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते.

Sugar Factory
Sugarcane FRP : ‘भीमा’ पहिली उचल २४०० रुपये देणार

परंतु काळाच्या ओघात सत्तेचा सोपान पूर्वेकडून पश्‍चिमेकडे सरकत गेला आणि कारखाना कर्जाच्या विळख्यात जखडत गेला. २०१३पासून सलग तीन वर्षे कारखाना बंद राहिला. या काळात कारखान्यावरील कर्जाचा बोजा वाढतच गेला. भाजप युतीचे सरकार २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर डॉ. राहुल आहेर यांनी कारखाना सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला.

मात्र बँकेची देणी, कामगारांचे पगार, व्यापाऱ्यांचे व उस उत्पादकांचे देणे वाढत गेले. यातून मार्ग काढत असताना शिखर बँकेबरोबर कारखाना व्यवस्थापनाने २०१५-१६ मध्ये करार केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गाळपास सुरुवात झाली. २०१७-१८ मध्ये चार महिने कारखाना सुरू राहिला. पण कामगार व व्यवस्थापनात वाद झाल्याने कारखाना पुन्हा बंद पडला.

२०१८-१९ मध्ये धाराशिव उद्योग समूहाने हा कारखाना चालविण्यास घेत त्या वेळी कामगार संघटना, राज्य बँक आणि व्यवस्थापनात त्रिसदस्यीय करार झाला. त्यानुसार कामगारांचे पगार, पीएफचे थकलेली दीड कोटी रुपयांची देणी, तयार मालापोटी ७५ रुपये प्रतिटनाप्रमाणे कामगारांना देण्यात येईल असे ठरले. परंतु यातही तीन वर्षांनंतर २९ ऑगस्ट २०२३ ला धाराशिव व्यवस्थापनाने काही कारणे देत कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Sugar Factory
Sugarcane FRP : सोमेश्‍वर कारखान्याचा ४३० रुपयांचा अंतिम हप्ता

ऊस लागवडही घटली

सुरुवातीला कसमादे परिसरात सहा ते सात हजार हेक्टरवर ऊस लागवड होऊन पाच ते सहा लाख टन गाळप होत होते. आजमितीस परिसरात केवळ एक हजार हेक्टरहून कमी ऊस क्षेत्राची नोंद असल्याचे दिसते.

काय म्हटले आहे नोटिशीत?

कर्मचाऱ्यांना नोटीस बजावत कारखाना व्यवस्थापनाने सांगितले, की अपुऱ्या उसामुळे क्षमतेपेक्षा कमी गाळप झाल्याने राज्य बँकेने भाडेकरार रद्द करण्याची नोटीस दिल्यामुळे कारखाना बंद ठेवावा लागणार आहे.

ज्या कामगारांना काम करण्याची इच्छा आहे अशा कामगारांना धाराशिव कारखान्याच्या सांगोला येथील युनिट ४ मध्ये सामावून घेण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. यामुळे वसाकाची चाके पुन्हा एकदा थांबणार आहेत.

वसाका कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी भाडेतत्त्वावर न देता शासनाच्या सहकार्याने तो सहकार तत्त्वावर चालवायला हवा. जेणेकरून तो लवकर कर्जमुक्त होईल. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना, सभासदांना, कामगारांना विश्‍वासात घेत व मतभेद विसरत सकारात्मक पाऊले उचलण्याची गरज आहे.-कुबेर जाधव, सहकार विषयाचे अभ्यासक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com