Sugarcane Crushing
Sugarcane Crushing Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : सांगली जिल्‍ह्यातील गाळप हंगाम मार्चअखेर संपण्याची शक्यता

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात सध्या तेरा साखर कारखान्यांचा (Sugar Factory) ऊस गळीत हंगाम (Sugarcane Crushing Season) सुरू आहे. ऊस गाळपात (sugarcane Crushing) सांगलीतील श्री दत्त इंडिया पहिल्या क्रमांकावर, म्हणजे ९.२४ लाख टन; तर साखर उताऱ्यात राजारामबापू साखर कारखान्याचे सर्वोदय युनिट पहिल्या क्रमांकावर, म्हणजे १२.७६ टक्के उतारा आहे.

जिल्ह्यात फेब्रुवारीअखेर ७२.२९ लाख टनाचे गाळप झाले. साखर उतारा (Sugar Recovery) ११.३६ टक्के आहे. जिल्ह्यातील सर्व कारखाने सुरू आहेत. पूर्व भागातील कारखाने पंधरा दिवसांत, तर उर्वरित मार्चअखेर बंद होण्याची शक्यता आहे.

यंदा गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे शासनाचे आदेश होते, मात्र तत्पूर्वीच काही कारखाने सुरू झाले होते. प्रत्यक्षात १५ नोव्हेंबरनंतरच हंगामाला गती आली.

मध्यंतरी झालेल्या वादळी पावसाने ऊस तोडणीवर मर्यादा आल्या होत्या, मात्र त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने हंगाम पुन्हा सुरू झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी एफआरपीतही प्रतिटन १५० रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांनाही चांगले पैसे मिळणार आहेत.

फेब्रुवारीअखेर ९४५.७७ लाख टन गाळप होऊन ९४७.१६ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी राज्याचा उतारा १०.२५ होता, आज तो १०.०१ पर्यंत घटला आहे.

कारखाने गाळप (साखर टन) उतारा (टक्के)

दत्त इंडिया, सांगली ९.२४ ११.२९

राजारामबापू, साखराळे ७.४८ ११.०९

विश्‍वास, चिखली ५.३४ १२.२६

हुतात्मा, वाळवा ४.२२ १०.८१

राजारामबापू, वाटेगाव ४.३६ १२.५३

जत, तिप्पेहळ्ळी २.७६ १०.८८

पतंगराव कदम सोनहिरा ७.१९ ११.९५

जी. डी. बापू लाड १७.५४ १०.२२

राजारामबापू-सर्वोदय ३.३२ १२.७६

मोहनराव शिंदे, आरग ३.६७ ११.१५

दालमिया, कोकरूड ४.६२ १२.०९

केन ॲग्रो ०.८४ १०.४५

उदगिरी, पारे ४.९१ ११.२६

सद्‌गुरू ६.३२ ८.९०

श्रीपती शुगर ०.४४ १०.१६

एकूण ७२.२९ ११.३६

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम मार्चअखेर संपेल, अशी चिन्हे आहेत. त्याला एखादा कारखाना अपवाद ठरेल. यंदा मशिन तोडणीमुळे लवकर तोडी मिळाल्या आणि एकरी टनेज घटल्यामुळे कारखाने लवकर बंद होत आहेत.
संजय कोले, शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनचा बाजार दबावात; कापूस, सोयाबीन, गहू, आले यांचे दर काय आहेत?

Pre Monsoon Rain : मॉन्सूनपूर्व वादळी पावसाचा दणका

APMC Market : व्यापाऱ्यांचा माल ओट्यांवर, तर शेतकऱ्यांचा रस्त्यावर

Koyna Dam : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणात इतका पाणीसाठी शिल्लक, सांगलीकरांना पाणी मिळणार?

Maharashtra Rain : राज्यभरात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज; राज्यात उन्हाचा चटकाही कायम; पावसाचा जोर वाढणार

SCROLL FOR NEXT