Sugarcane Maharashtra agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season Solapur : सोलापुरात ऊस गळीत हंगामास विलंब; खासगी साखर कारखाने गाळपात पुढे

Sugarcane Crushing : सोलापूर जिल्ह्यातील ३४ पैकी १७ साखर कारखाने १ डिसेंबरअखेर चालू झाले आहेत. त्यामध्ये १० लाख ३५ हजार ३४० मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे.

sandeep Shirguppe

Sugarcane Crushing Season Solapur : सोलापूर जिल्ह्यातील ३४ पैकी १७ साखर कारखाने १ डिसेंबरअखेर चालू झाले आहेत. त्यामध्ये १० लाख ३५ हजार ३४० मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. तर ७.०९ टक्के सरासरी साखर उताऱ्याने ७ लाख ३४ हजार ९० क्विंटल साखर उत्पादन झाले असल्याची माहिती साखर आयुक्तालयाकडून मिळाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात ५ सहकारी व १२ खासगी कारखाने सुरू झाले आहेत. सहकारी कारखान्यात ४ लाख ६१ हजार २८१ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून ३ लाख ६२ हजार ५०९ क्विंटल साखरनिर्मिती झाली आहे. खासगी कारखान्यांनी ५ लाख ७४ हजार ५९ मेट्रिक टन उसाचे गाळप करत ३ लाख ७१ हजार ५९० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.

जिल्ह्यातील सहकारी कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ७.३३ तर खासगी कारखान्यांचा उतारा ६.४७ टक्के आहे. जिल्ह्यात सहकार महर्षी कारखाना गाळप व साखर उत्पादनात सध्यातरी आघाडीवर आहे. पांडुरंग कारखाना दुसऱ्या क्रमांकावर आहे.

१२४ कारखान्यांचे धुराडे पेटले

यंदाच्या गळीत हंगामात राज्यात सहकारी व खासगी मिळून आतापर्यंत १२४ कारखान्यांची धुराडी पेटून साखर उत्पादन सुरू झाले आहे. त्यामध्ये ६७.८२ लाख टन उसाचे गाळप होऊन ५०.०८ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. राज्याचा साखर उतारा ७.३८ टक्के इतका आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हा साखर उताऱ्यात अग्रभागी राहिला आहे. यावर्षीचा साखर हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास मंत्री समितीने परवानगी दिली होती.

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमुळे कारखानदार प्रचारात गुंतल्याने अनेक कारखाने २० नोव्हेंबरनंतरच सुरू झाले आहेत. कोल्हापूर विभागात २८, पुणे १८, सोलापूर २०, अहमदनगर १३, छत्रपती संभाजीनगर १४, नांदेड २४ तर अमरावती विभागात एका कारखान्याने गाळप हंगाम सुरू केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT