Pune News: राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला असतानाच, पहाटे गारठा जाणवत आहे. निफाड येथे किमान तापमानाचा पारा पुन्हा १० अंशांच्या खाली आला आहे. आजपासून (ता. १) राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..दक्षिण कर्नाटकमध्ये १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वारे वाहत आहेत. तमिळनाडूपासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. यातच शनिवारी (ता. २८) राजस्थानच्या अलवर येथे देशाच्या सपाट भुभागावरील नीचांकी १० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये आंध्र प्रदेशच्या अनंतपूर आणि तमिळनाडूच्या वेल्लूर येथे देशातील उच्चांकी ३७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली..Heatwave Alert: उकाडा कायम राहणार.शनिवारी (ता. २८) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ९.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३६.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात उन्हाच्या झळा वाढल्याने अनेक ठिकाणी पारा ३५ अंशांच्या वर गेला आहे. अंशतः ढगाळ हवामानामुळे उकाडा त्रासदायक ठरत आहे. आज (ता. १) राज्याचे कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत ३ ते ४ अंशांनी अधिक राहण्याची शक्यता आहे. उन्हाचा चटका आणि उकाडा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे..शनिवारी (ता. २८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३२.५---१३.५अहिल्यानगर---३४.१---१३.७धुळे---३२.५---१२जळगाव---३३.४---१७.६जेऊर---३६.५---१३कोल्हापूर---३४.६--१८.६.Maharashtra Weather Update: उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज; राज्यातील किमान आणि कमाल तापमानात होतेय वाढ.महाबळेश्वर---२७---१५मालेगाव---३४.८---१४.४नाशिक---३१.१---१४निफाड---३१.८---९.१सांगली---३४.७---१८.१सातारा---३३.५---१५.१सोलापूर---३६.९---१९.९सांताक्रूझ---३०.४---२०डहाणू---३०.८---१८.४.रत्नागिरी---३२.६---२०छत्रपती संभाजीनगर---३३.५---१८.६धाराशिव---३४.२---१९.२परभणी---३४.८---१९परभणी (कृषी)---३४.४---१८अकोला---३५.३---२०.१अमरावती---३५.८---१८.९भंडारा---३१---२०.बुलडाणा---३३---१९.२ब्रह्मपुरी---३६.४---१९.२चंद्रपूर---३५.२---२३गडचिरोली---३४.२---१७.४गोंदिया---३३.५---१८नागपूर---३३.६---१९.४वर्धा---३५---२०.९वाशीम---३५.६---१७.८यवतमाळ---३४.२---१९.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---९.१---३४.८पश्चिम महाराष्ट्र---१३---३६.९मराठवाडा---१८---३४.८विदर्भ---१७.४---३६.४कोकण---१८---३२.६.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.