Kolhapur News: यंदाच्या हंगामात (२०२५-२६) गेल्या वर्षीपेक्षा बारा टक्के साखर उत्पादन वाढण्याचा अंदाज ‘इस्मा’ने वर्तविला आहे. हंगामाच्या शेवटी २९३ लाख टन साखरेचे निव्वळ उत्पादन होईल असा अंदाज आहे. इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (इस्मा) बैठकीत उपग्रह प्रतिमांचा आधार घेऊन हा अंदाज वर्तवण्यात आला. .गेल्या वर्षीपेक्षा यंदा साखर उत्पादनात वाढ असली तरी महाराष्ट्र आणि कर्नाटकात शेतकऱ्यांचे उत्पादन कमी आले आहे. अति पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे उसाची वाढ नीट झाली नाही. यामुळे उसाच्या उत्पादनात घट आली. याबरोबरच साखर कारखानेही क्षमतेइतके गाळप करू शकले नाहीत..Sugar Production: साताऱ्यात १ कोटी ४ लाख क्विंटल साखरेची निर्मिती.हंगामाच्या सुरवातीला विक्रमी उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता पण जसा हंगाम पुढे सरकला तशी त्यात घट झाली. मोठी घट नसली तरी अपेक्षित अंदाजाइतके उत्पादन निघाले नाही. महाराष्ट्र आणि कर्नाटक या प्रमुख ऊस उत्पादक राज्यांमध्ये जानेवारीपासून अनेक भागांत उसाला लवकर तुरे येण्यास सुरुवात झाली. याचा मोठा फटका गाळपाला बसल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले..२०२६-२७ हंगामासाठी लागवड महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये या वर्षीच्या तुलनेत सुधारली आहे. परिणामी, २०२६-२७ चा गाळप हंगाम आशादायक दिसत आहे. हंगामाच्या अखेरीस अंदाजे ५३ लाख टन इतका सुरुवातीचा साठा (ओपनिंग स्टॉक) असेल, जो पुरेसा असण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली..Sugar Production: विलास साखर कारखान्यात ११,११,१११ व्या पोत्याचे पूजन.यंदाचा राज्यनिहाय अंतिम अंदाजराज्य अंदाज (लाख टन)उत्तर प्रदेश ९२.५महाराष्ट्र १०६.कर्नाटक ४८.४९तमिळनाडू ८.२०गुजरात ८.७३इतर राज्ये २९.०.यंदाच्या हंगामानंतर अंदाजे अशी असेल परिस्थिती ( लाख टन)ऑक्टोबर २०२५ चा सुरुवातीचा साठा ५०हंगामातील एकूण उत्पादन ३२४इथेनॉलकडे वळण ३१निव्वळ उत्पादन २९३एकूण उपलब्धता ३४३अंतर्गत वापर २८३निर्यात ७३० सप्टेंबर २०२६ चा अपेक्षित साठा ५३.एकूण साखर उत्पादन: ३२४ लाख टनइथेनॉलसाठी अंदाजे साखर वळवण्याचा अंदाज : ३१ लाख टननिव्वळ साखर उत्पादन : २९३ लाख टन (गेल्या वर्षीपेक्षा १२ टक्के जास्त).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.