Tembhurni News : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नंबर १ पिंपळनेर व युनिट नंबर २ करकंब कारखान्याकडे १६ ते ३१ जानेवारी दरम्यान गळितास आलेल्या उसाचे अनुदानासह प्रतिटन २७५० रुपयांप्रमाणे ६८ कोटी २१ लाख रुपये ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले असून,
१५ जानेवारी ऊसतोडणी वाहतूक बिले वाहनमालकांच्या खात्यावर जमा करण्यात आली असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नंबर १ पिंपळनेर व युनिट नंबर २ करकंब येथील सन २०२३-२४ चा गाळप हंगाम सुरू असून युनिट नंबर १ येथे आजअखेर ११ लाख ८३ हजार ०८७ मे.टन व युनिट नंबर २ येथे आजअखेर ४ लाख १० हजार ०१६ मे.टन ऊस गाळप झाले आहे.
दोन्ही युनिटचे मिळून आजअखेर १५ लाख ९३ हजार १०३ मे.टन उसाचे गाळप झालेले आहे. या हंगामामध्ये दोन्ही युनिटकडे कडे १६ ते ३१ जानेवारी कालावधीत गाळपास आलेल्या सर्व उसास जाहीर केल्याप्रमाणे प्रतिटन ५० रुपये अनुदानासह प्रतिटन २७५० रुपयाप्रमाणे ऊसबिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. त्यापोटी कारखान्याने ६८ कोटी २१ लाख बँकेत जमा केले आहेत.
फेब्रुवारीपासून प्रतिटन २८०० रुपये दर
१ ते २८ फेब्रुवारी दरम्यान गाळपास येणाऱ्या उसास अनुदानासह प्रतिटन २८०० रुपये व १ मार्चपासून येणाऱ्या उसास प्रतिटन २८५० रुपयांप्रमाणे उत्तेजनार्थ वाढीव ऊसदर सर्व सभासदांना मिळणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.