Sugar Production agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Production : यंदाच्या ऊस हंगामात साखर उत्पादन घटलं, ९० लाख क्विंटल उत्पादन कमी, ऊस गाळपातही पिछाडी

Sugarcane Crushing : मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा ७६.७८ लाख टन उसाचे गाळप कमी झाले आहे. गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत एकूण ४१७.२१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले होते.

sandeep Shirguppe

Maharashtra Sugar Production : राज्यात १ नोव्हेंबरपासून उसाचा गळीत हंगाम सुरू झाला, परंतु अनेक जिल्ह्यात ऊस दरावरून संघर्ष निर्माण झाल्याने नोव्हेंबर महिन्यात हंगाम अगदी संथ गतीने चालला. दरम्यान ऊस दराचा तोडगा निघाल्यानंतर राज्यात पूर्ण क्षमतेने कारखाने सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात गाळप होत आहे. काल (ता.२८) गुरुवारपर्यंत राज्यात एकूण ३४०.४३ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे.

यामध्ये महाराष्ट्रात ७७.२१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पुणे विभागात झाले आहे तर आतापर्यंतच्या एकूण ऊस गाळपातून २९३.८१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा ७६.७८ लाख टन उसाचे गाळप कमी झाले आहे. गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत एकूण ४१७.२१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले होते.

दरम्यान, यंदा साखर उत्पादनही ९० लाख १० हजार क्विंटलने कमी झाले आहे. गेल्या वर्षी याच तारखे अखेरपर्यंत ३८३.९१ लाख क्विंटल इतके साखर उत्पादन झाले होते. यंदाच्या गळीत हंगामात आतापर्यंत एकूण १९४ साखर कारखान्यांनी उसाचे गाळप सुरु केले आहे. यामध्ये ९५ सहकारी आणि १९ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे.

दरम्यान, यंदा सरासरी उताऱ्यात ०.५७ टक्क्यांनी घट झाली. राज्याचा सध्याचा सरासरी साखर उतारा ८.६३ टक्के इतका आहे. गत वर्षों हाच साखर उतारा हा ९.२० टक्के इतका होता. यावरून यंदा साखर उताऱ्यात ०.५७ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले आहे. साखर आयुक्तालयाच्यावतीने यंदाच्या ऊस गळीत हंगामाची सद्यःस्थिती दर्शविणारा अहवाल प्रसिद्ध केला. त्यातून हे स्पष्ट झाले.

कोल्हापूर विभागाने साखर उताऱ्याच्या टक्केवारीत आघाडी घेतली आहे. तेथील टक्केवारी राज्यात सर्वाधिक ९.८३ टक्के इतकी आहे. नागपूर विभागातील साखर उताऱ्याची टक्केवारी ही सर्वात कमी म्हणजे केवळ २.५८ टक्के इतकी आहे.

आतापर्यंत ऊस गाळप सुरु केलेल्या एकूण कारखान्यांमध्ये कोल्हापूर विभागातील ३७, पुणे विभागातील २९, सोलापूर विभागातील ४७, नगर विभागातील २५, छत्रपती संभाजीनगर विभागातील २२. नांदेड विभागातील २९, अमरावती विभागातील दोन आणि नागपूर विभागातील तीन साखर कारखान्याचा समावेश आहे.

विभागनिहाय उसाचे गाळप (मेट्रिक टनमध्ये)

कोल्हापूर: ६९.९४ लाख, पुणे : ७७.२१, सोलापूर : ७४.४२, नगर : ४४.०१, छत्रपती संभाजीनगर: ३२.२३, नांदेड : ३८.९९, अमरावती : ३.०१, नागपूर: ०.६२

विभागनिहाय साखर उत्पादन (क्विंटलमध्ये)

कोल्हापूर : ६८.७३ लाख, पुणे: ६८.४९ लाख, सोलापूर: ५९.०९ लाख नगर: ३७.४४ लाख, छत्रपती संभाजीनगर: २३.७९ लाख, नांदेड ३३.५७ लाख, अमरावती: २.६ लाख, नागपूर : ०.१६ लाख

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT