Sugar Industry  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Industry : साखर उद्योग पुन्हा आर्थिक संकटात

Sugar Season : दुष्काळी स्थितीमुळे साखर कारखाने पुन्हा आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी साखर उद्योगाने राज्य शासनाला साकडे घातले आहे.

मनोज कापडे

Pune News : दुष्काळी स्थितीमुळे साखर कारखाने पुन्हा आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी साखर उद्योगाने राज्य शासनाला साकडे घातले आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) राज्य सरकारकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे.

साखर कारखान्यांना दिलेल्या सर्व कर्जांचे हप्ते व व्याज वसुलीच्या प्रक्रियेला किमान तीन वर्षांचा विलंबावधी द्यावा, अशी मागणी ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

“दुष्काळी स्थिती, पाणीटंचाई, उसाची कमी उपलब्धता यामुळे गाळपाचे दिवस घटले आहेत. साखर तयार करण्यासाठी येणारा खर्च आणि शेतकऱ्यांना दिली जाणारी एफआरपी यातील दुरावा वाढला आहे. त्यातून कारखान्यांचे आर्थिक ताळेबंद विस्कळीत होत आहेत,” असे मुख्यमंत्र्यांना कळविण्यात आले आहे.

साखर उद्योगामुळे राज्यातील २५ लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळतो. तसेच या उद्योगावर आधारित जवळपास सव्वा कोटी लोकांचा उदरनिर्वाह होतो. त्यामुळे कर्जात अडकलेल्या कारखान्यांना विलंबावधी देणे गरजेचे आहे.

कर्ज व व्याज वसुलीच्या हप्त्यांना विलंबावधी मिळाल्यास साखर उद्योगाला आर्थिक अडचणींमधून बाहेर येण्यास पुरेसा वेळ मिळू शकतो. उद्योग आधीसारखा चांगल्या आर्थिक स्थितीत आल्यास या उद्योगावर आधारित शेतकरी व इतर लोकांच्या समृद्धीला बाधा येणार नाही, असा युक्तिवाद साखर उद्योगाने केला आहे.

साखरेचे दर घसरण्याची शक्यता

साखरेचे दर प्रतिक्विंटल ३ हजार ६५० रुपयांवरून ३ हजार ४०० रुपयांपर्यंत घसरले आहेत. साखरेला मागणीदेखील नाही. मात्र मार्चअखेर साखरेचे दर अजून घसरून ३ हजार ३०० ते ३ हजार २०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील साखर कारखान्यांना सरकारने लवकरात लवकर दिलासा द्यावा, असेही साखर उद्योगाचे म्हणणे आहे.

...या कारणांमुळे साखर उद्योग अडचणीत

- दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस उपलब्धता घटली. लागवडीवरदेखील परिणाम झाला

- पाणीटंचाईमुळे गाळपाच्या दिवसांमध्ये घट, साखरेचे दर कमी असल्याने उत्पादन खर्च वाढला

- कच्चा मालाच्या किमती, वीज, पाणी, वेतन, मजुरी दरात मोठी वाढ. त्यामुळे कारखान्यांवर जादा आर्थिक भार

- साखरेचे दर व एफआरपी यातील अंतर वाढल्यामुळे कारखान्यांचे ताळेबंद विस्कळीत

- केंद्राने इथेनॉलवर निर्बंध लादल्यामुळे कारखान्यांचे आर्थिक नुकसान

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

India Economy: देशात सध्या अस्वस्थता : शरद पवार

Onion Price Crash: कांद्याच्या ढिगाऱ्यावर शेतकऱ्याचा आक्रोश

SCROLL FOR NEXT