Sugar Factory Owners agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Factory Owners : शेतकरी संघटनांनी सहकार्य करावे, साखर कारखानदारांची विनंती

Sugar Production : उसाबरोबरच कारखान्यांच्या साखर उत्पादन खर्चातही वाढ झाली आहे. अन्य जिल्ह्यात हंगाम सुरळीत सुरू आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Sugar Factories : गेल्या हंगामातील साखरेला शेवटच्या दोन- तीन महिन्यातच प्रति क्विंटल ३६०० रुपये दर मिळालेला आहे. त्यामुळे जादा दर देणे कारखान्यांना शक्य नाही. कर्नाटकसह अन्य जिल्ह्यांत हंगाम सुरु असताना जिल्ह्यातील कारखाने बंद ठेवणे चांगले नाही, कारखाने वेळेत सुरु झाले नाहीत तर यातील बहुतांशी कारखाने अडचणीत येतील. त्यामुळे संघटनांनी कारखान्यांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्ह्यातील कारखानदारांच्यावतीने करण्यात आले आहे.

पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यात उसाची उपलब्धता कमी आहे. हंगाम ९० ते १०० दिवसच चालेल. धरणात पाणी कमी तर तेही वापरण्यावर निर्बंध आहेत. कर्नाटकात हंगाम सुरू झाल्याने तिकडची वाहने जिल्ह्यात दाखल झाली आहेत.

उसाबरोबरच कारखान्यांच्या साखर उत्पादन खर्चातही वाढ झाली आहे. अन्य जिल्ह्यात हंगाम सुरळीत सुरू आहे. पुणे जिल्ह्यात हंगामच जास्त दिवस चालत असल्याने काही कारखान्यांनी एफआरपीपेक्षा जास्त पैसे दिले आहेत. अन्य जिल्ह्यांत तीन हप्त्यात एफआरपी दिली जाते, कोल्हापुरात मात्र एकरकमी दिली जाते. याचा विचार करण्याचे आवाहन या निवेदनात करण्यात आले आहे.

यापूर्वीच्या दोन-तीन हंगामात साखरेचे दर घसरल्याने कर्ज काढून कारखान्यांनी एफआरपी दिली. या कर्जाचे हप्ते सुरूच आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांनी सरासरी ३३०० ते ३३५० प्रती क्विंटल दराने साखर विकली आहे. ३६०० रूपये दर हा अलिकडच्या तीन महिन्यातील आहे. तोही दर सरकारने जाहीर केलेल्या कोट्यापुरता मर्यादित आहे.

साखरेचा हमीभाव २०१९ मध्ये ३१०० रुपये प्रती क्विंटल केला, पण त्यानंतर गेल्या चार वर्षात एफआरपीत मात्र वाढ होऊन हा दर प्रती टन ३१५० वर पोहचला आहे. या बाबीचाही विचार झाला पाहीजे, असे मत या निवेदनात नोंदवले आहे. शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे कारखाने गाळपाविना बंद आहेत.

कर्नाटक व अन्य जिल्ह्यातील कारखाने व्यवस्थित सुरू असताना जिल्ह्यातील अडवणूक योग्य नाही. तसेच सणासुदीच्या काळात साखर उडवल्याने अर्थिक कोंडी होत आहे. याचा गांभीयनि विचार करावा, असेही या निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन शरद नरंदे, दत्त- शिरोळ, पंचगंगा-इचलकरंजी, गुरूदत्त- टाकळी, जवाहर हुपरी, शाहू-कागल, मंडलिक- हमीदवाडा, बिद्रो-कागल, दौलत-हलकर्णी, भोगावती परिते आदी कारखान्यांच्यावतीने प्रसिध्दीला दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID: फार्मर आयडीच्या गोंधळाचा शेतकऱ्यांना फटका

Adulteration Issue: दूध, अन्नभेसळ टाळण्यासाठी देशी गोपालन कार्यक्रमांची गरज

Agri Diploma Jobs: कृषी पदविकाधारकांना नोकर भरतीत न्याय देणार; कृषिमंत्री कोकाटे

Banana Harvest: खानदेशात आगाप कांदेबाग केळीच्या काढणीला सुरुवात

India China Relation: भारत-चीनमध्ये हवा खुला संवाद : एस. जयशंकर

SCROLL FOR NEXT