Tur Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Crop : तुरीचे उभे पीक अचानक वाळू लागले ; तेल्हारा तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील पिकावर परिणाम; आर्थिक नुकसानीचे संकट

Tur Crop Damage : गेल्या आठवडाभरात झालेला वातावरण बदलाचा फटका तुरीच्या पिकाला बसल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत.

Team Agrowon

Akola News : अकोला ः गेल्या आठवडाभरात झालेला वातावरण बदलाचा फटका तुरीच्या पिकाला बसल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यात मोठ्या क्षेत्रावर तुरीचे पीक अचानक वाळत असल्याचे समोर आले आहे.

तज्ज्ञांच्या मते मागील पाच-सात दिवसांत दिवस व रात्रीच्या तापमानात कमालीची घट झाल्याने हा परिणाम झाल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात लागवड केलेले तुरीचे पीक परतीच्या पावसामुळे चांगले जुळून आलेले आहे. बहुतांश ठिकाणी पिकात शेंगांमध्ये दाणे परिपक्व होण्याची, दाणे भरण्याची अवस्था सुरू झालेली आहे.

या आठवड्यात जिल्ह्यात थंडीचा जोर बराच वाढला. काही ठिकाणी रात्रीचे तापमान १० अंशाच्याही आत आल्याच्या नोंदी झालेल्या आहेत. शिवाय दिवसभरही वातावरण थंड राहत आहे. तत्पूर्वीचे वातावरण हे दिवस बऱ्याच प्रमाणात गरम होते. अशा गरम वातावरणातून एकदम थंडगार वातावरणाला सुरुवात झाल्याचा फटका अनेक पिकांना बसतो आहे. प्रामुख्याने तुरीला अधिक नुकसानकारक ठरल्याचे दिसून येते.

तेल्हारा तालुक्यात खरीप हंगामात सोयाबीनमध्ये तुरीची आंतरपीक म्हणून लागवड अधिक प्रमाणात झालेली आहे. कपाशीच्या पिकातही काही शेतकऱ्यांनी तुरीच्या तासांची लागवड केली. हे पीक बहारदार होते. शेंगा लागण्याच्या स्थितीत अळीने उच्छादही घातला. शेतकऱ्यांनी वेगवेगळी कीडनाशके फवारणी करीत पीक वाचवण्यासाठी प्रयत्न केले. आता शेंगा परिपक्व होऊ लागलेल्या असतानाच हे नवे संकट उभे राहीले आहे. कृषी विभागाचे अधिकारी व तज्ज्ञांनी या भागात भेट देऊन पिकाची पाहणी करावी, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

अचानकपणे पीक सलगपणे वाळत असेल तर गेल्या काही दिवसांत वातावरणात झालेल्या बदलांचा हा परिणाम असू शकते. काही दिवस रात्रीचा पारा १० अंशाच्या खाली आला होता. तापमानातील बदलामुळे अशा प्रकारे झाडे वाळू शकतात.
- डॉ. चारूदत्त ठिपसे, विषयतज्ज्ञ, केव्हीके, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra River Rejuvenation: अखेर नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन

POCRA Research Agreement: ‘पोकरा’अंतर्गत संवर्धित शेतीसाठी संशोधन करार

Supe Water Supply Scheme: डोक्यावरील हंडा उतरणार !

Revenue Officer Corruption: उपळाईचा मंडल अधिकारी लाच घेताना अटकेत

Rural Development: लोकाभिमुख होऊन गावांची विकासकामे करा: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT