Collector Kumar Ashirwad Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Input Center : पंढरपुरातील कृषी सेवा केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांकडून अचानक भेटी

Team Agrowon

Solapur News : खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी खते-बियाण्यांच्या खरेदीच्या तयारीला लागलेला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्राकडून बी-बियाणे, खते याविषयी कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये, यासाठी पंढरपूर तालुक्यातील काही कृषी सेवा केंद्रांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अचानकपणे भेट देत खते-बियाण्यांची उपलब्धता, विक्री याची माहिती घेतली.

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी पंढरपूरचे उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत मोरे, पंचायत समितीचे विकास साळुंखे यांच्यासह कृषी सेवा केंद्रांना भेटी दिल्या. पंढरपूरमधील मे. प्रेरणा बीज भांडार व मे. फुलचंद रामचंद गांधी या कृषी सेवा केंद्रांना भेटी दिल्या.

या वेळी त्यांनी विक्री परवाने, बियाणे व खत यांची खरेदी बिले, साठा पुस्तक, दर फलक, भाव फलक, टोल फ्री क्रमांक, मुदतबाह्य निविष्ठा, तसेच बियाणे, खते यांचे बॅग, पिशवीवर कोणती माहिती छापलेली असते या बाबत माहिती घेतली. खरेदी बिलाप्रमाणे साठा पुस्तकामध्ये बियाणे, खतांची आवक घेतली आहे का, याची खात्री केली व त्याच्या नोंदी तपासल्या.

व्हॅाट्‍सअॅपवर करा तक्रार

खरीप हंगामाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना तक्रारी असल्यास त्यांनी कोठे तक्रार करावी, या बाबत ही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी माहिती जाणून घेतली. विक्री केंद्राच्या दर्शनी भागत लावण्यात आलेला महाराष्ट्र शासन, कृषी विभाग टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० हा चालू आहे, का याची कॉल करून खात्री करून घेतली. त्यानंतर मुदत बाह्य निविष्ठाबाबत काय कार्यवाही केली, हेही जाणून घेतले. मुदतबाह्य निविष्ठा शेतकऱ्यांना विक्री होणार नाहीत, या बाबत योग्य ती दक्षता कृषी विभागाने काटेकोरपणे घ्यावी, असेही त्यांनी निर्देश दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Floriculture : शेतकरी नियोजन : फुलशेती

Narendra Modi and Rahul Gandhi : निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदींसह राहुल गांधी राज्यात

Fruit Crop Insurance : आंबिया बहरातील फळपिकांसाठी विमा योजना

Flood Affected Farmer : महापूर बाधित शेतकऱ्यांना मिळणार पैसे, कोल्हापूर कृषी विभागाकडून याद्या अपलोडींगचे काम सुरू

Nandurbar Earthquake : नंदुरबार भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं

SCROLL FOR NEXT