Avacado Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Success Story: नाशिकच्या मातीत घेतले ‘ॲव्होकॅडो’चे यशस्वी उत्पादन

Avacado Production: पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथील फ्राटेली शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून लखमापूर (ता. दिंडोरी) येथील कंपनीच्या प्रक्षेत्रावर ॲव्होकॅडो फळाच्या ‘मालुमा’ या वाणाचे दोन वर्षे ४ महिन्यांत यशस्वी उत्पादन घेण्यात आले आहे.

मुकूंद पिंगळे

Nashik News: द्राक्षपंढरी म्हणून नाशिकची देशभरात ओळख आहे. यासोबतच जिल्ह्यात शेतकऱ्यांनी डाळिंब, सीताफळ, स्ट्रॉबेरी, आंबा, केळी असे पीकप्रयोग यशस्वी केले आहेत. तर आता पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथील फ्राटेली शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून लखमापूर (ता. दिंडोरी) येथील कंपनीच्या प्रक्षेत्रावर ॲव्होकॅडो फळाच्या ‘मालुमा’ या वाणाचे दोन वर्षे ४ महिन्यांत यशस्वी उत्पादन घेण्यात आले आहे.

पिंपळगाव येथील प्रयोगशील शेतकरी व फ्राटेली शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष अनंत मोरे यांनी सहकारी मित्रांनी २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिका तर २०१७ मध्ये चिली व पेरू देशांमध्ये अभ्यास दौरा केला होता. त्यावेळी ‘ॲव्होकॅडो’ या फळपिकाच्या लागवडी पाहण्यात आल्या. यामध्ये लागवड पद्धती, उत्पादन यांसह जागतिक बाजारपेठेतील मागणी अशा बाबी त्यांनी अभ्यासल्या.

त्यानंतर पुढील टप्प्यात त्याचा प्रयोग करण्याचे ठरवले. त्यानुसार फ्राटेली शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून कंपनीच्या लखमापूर येथील प्रक्षेत्रावर प्रायोगिक तत्त्वावर एक एकर क्षेत्रावर सुमारे तीनशे झाडांची लागवड झाली. यात दक्षिण आफ्रिकेचे मूळ वाण असलेल्या मालूमा, हस, झूटानो यांसह भारतीय प्रजातीच्या काही झाडांचाही समावेश होता. सर्वाधिक १५० झाडे ‘मालुमा’ या वाणाची आहेत. यामध्ये ‘ड्यूक ७’ व ‘बाउंटी’ हे दोन प्रकारचे रूटस्टॉकस वापरण्यात आले. वाण व रूटस्टॉक हे मूळ दक्षिण आफ्रिकेतून आयात केलेले आहेत. लागवड १२ बाय १० फूट अंतरावरील आहे.

उल्लेखनीय उत्पादन

मुबलक प्रमाणातील प्रथिने आणि जीवनसत्त्वे या गुणधर्मामुळे ‘ॲव्होकॅडो’ला जागतिकस्तरावर मागणी आहे. प्रामुख्याने ‘मालुमा’ या वाणावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. फेब्रुवारी २०२३ मध्ये लागवड केल्यानंतर तिसऱ्या वर्षी फळधारणा होईल अशी अपेक्षा होती. मात्र लागवडीनंतर सुमारे २८ महिन्यांतच फळे काढणीस आली. पहिल्याच काढणीस प्रति झाड ५० ते १२५ पर्यंत फळे मिळाली. फळांचे वजन २०० ते २५० ग्रॅमच्या दरम्यान राहिले. काही फळे ३०० ग्रॅम वजनाची होती. या फळाचे उत्पादन घेण्यासाठी छाटणीची गरज नसते. तर हंगामी कामात मजुरांची गरज व खर्चदेखील कमी असतो. अन्य फळबागांप्रमाणे ‘स्ट्रक्चर’ची गरज नसल्याने भांडवली खर्च कमी असतो असे अनंत मोरे यांनी ‘ॲग्रोवन’ला सांगितले.

गडकरी-पवार यांच्याकडून कौतुक

‘मालुमा’ वाणाच्या ‘ॲव्होकॅडो’चे यशस्वी उत्पादन मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फळे भेट देण्यात आली. हा नवा प्रयोग तरुण शेतकऱ्यांनी यशस्वी केल्याबद्दल दोन्ही मंत्री महोदयांकडून त्यांचे कौतुक करण्यात आल्याचे अनंत मोरे यांनी सांगितले. त्याप्रसंगी गणेश मोरे, प्रवीण मोगल, गिरीश मोरे हे देखील उपस्थित होते.

मालुमा वाणाची वैशिष्ट्ये

फुलोऱ्यानंतर पाच महिन्यांत फळे काढणीस योग्य.

फळे खडबडीत. जास्त चमकदार त्वचा

अन्य वाणांच्या तुलनेत मोठा आकार, वजन अधिक

नैसर्गिक आपत्ती व मजूर समस्या निर्माण झाल्याने द्राक्ष पिकात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर फलोत्पादनात नवीन पर्यायी पीक म्हणून ॲव्होकॅडोचा प्रयोग हाती घेण्यात आला होता. विविध वाणांच्या लागवडीत ‘मालुमा’चे उत्पादनाच्या अंगाने परिणाम चांगले आले आहेत. उत्पादनासाठी वेगळ्या प्रकारची छाटणी करावी लागत नाही. शेंडा छाटणी करून सूर्यप्रकाश येईल अशी व्यवस्था करावी लागते. अन्य फळांच्या तुलनेत अन्नद्रव्य व्यवस्थापनावर जास्त खर्च करण्याची गरज नाही. तुलनेत मजुरांची गरज व एकरी उत्पादन खर्च आहे. येणाऱ्या काळात प्रायोगिक तत्त्वावर विविध प्रयोग अभ्यासून पुढे जाण्या शिवाय पर्याय नाही.
अनंत भास्कर मोरे, अध्यक्ष, फ्राटेली शेतकरी उत्पादक कंपनी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Compensation: पीकविम्याची भरपाई सोमवारी थेट खात्यात येणार; २०२२ ते रब्बी २०२४-२५ ची भरपाई मिळणार

Agrowon Podcast: कापूस दर दबावातच; उडद- ढोबळी मिरचीचे भाव स्थिर, काकडीचे दर नरमले, तर पेरुचा आवक स्थिर

Ragi Cultivation: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात, नाचणी रोप लागवड पूर्ण

Solar Power: सांगली, कोल्हापुरात ‘सौर कृषिवाहिनी’ योजनेला गती द्या; लोकेश चंद्र

Monsoon Rain: आज, उद्या राज्यात पावसाची शक्यता; विदर्भात पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT