Agriculture Minister : कृषिमंत्र्यांबाबत मंगळवारपर्यंत निर्णय; ...तर धनंजय मुंडेंना पुन्हा संधी देऊ : उपमुख्यमंत्री अजित पवार

Maharashtra politics 2025 : २०२४ मधील कृषी साहित्य खरेदी नियमानुसारच झाल्याचा निर्णय देत उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांना निर्दोष ठरवलं आहे. त्यामुळे मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
Agriculture Minister
Agriculture MinisterAgrowon
Published on
Updated on

Ajit Pawar news : कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या संदर्भात मंगळवारपर्यंत निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. शुक्रवारी (ता.२५) पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. यावेळी छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षाला मारहाण प्रकरणात ९ लोकांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

अजित पवार म्हणाले, "पोलिसांनी ११ आरोपींपैकी ९ आरोपींवर एफआयआर दाखल केली आहे. एका नावाची व्यक्ती त्यामध्ये नाही तर एक व्यक्तीचं नाव चुकलं आहे, असं पोलिसांनी सांगितलं. तरी देखील घाडगे भेटल्यानंतर लातूरच्या एसपींना मी फोन लावला. त्यांना मी सांगितलं, जो कायदा हातात घेईल, त्यावर योग्य कारवाई झालीच पाहिजे. मंगळवारपर्यंत या प्रकरणात निर्णय घ्यायचा आहे. मला सोमवारी माणिकराव कोकाटेंशी चर्चा करायची आहे. त्यानंतर मंगळवारपर्यंत निर्णय घेणार आहे." असे ते म्हणाले.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली. तसेच कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. त्यातच रमी प्रकरणावर पत्रकार परिषदेत उत्तर देताना कृषिमंत्री कोकाटे यांनी महाराष्ट्र शासन भिकारी आहे, असे वादग्रस्त विधान केले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कृषिमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कृषिमंत्र्यांचा राजीनामा घेतला जाईल, अशी अटकळ बांधली जात आहे.

Agriculture Minister
Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सासरवाडीतील शेतकरी कर्जमाफीवरून आक्रमक

मुंडेंना पुन्हा मंत्रीपद?

दुसरीकडे २०२४ मधील कृषी साहित्य खरेदी नियमानुसारच झाल्याचा निर्णय देत उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांना निर्दोष ठरवलं आहे. त्यामुळे मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

"कृषीच्या बाबत मुंडे यांना न्यायालयाने निर्दोष ठरवलं आहे. तसेच या प्रकरणात याचिका करणाऱ्याला एक लाख रुपये दंड केला आहे. आपल्या इथे न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे. मुंडे यांची अजून एक प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरु आहे. ती चौकशी पूर्ण झाल्यानंतर वस्तूस्थिती पुढे येईल. त्यामध्ये त्यांचा दुरान्वयाने संबंध नसेल तर पुन्हा संधी देऊ." असेही ते म्हणाले.

Agriculture Minister
Dhananjay Munde Resignation: संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकीय भूकंप; धनंजय मुंडे यांचा राजीनामा!

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात खांदेपालट करण्याची शक्यता असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. पहिल्या तीन महिन्यातच मुंडे यांचा राजीनामा घेण्याची नौबत मुख्यमंत्र्यांवर ओढावली होती. त्यानंतर सातत्याने वादग्रस्त विधान आणि मनमानी कारभारावरून मंत्र्यांवर विरोधकांकडून गंभीर आरोप सत्र सुरु आहे. त्यामुळे स्पष्ट बहुमत असूनही महायुती सरकारची कोंडी होत असल्पायाचे हायला मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com