Illegal Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Illegal Fertilizer : अनधिकृत रासायनिक खताचा साठा जप्त

HTBT Seed Scam : खरीप हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच अनधिकृत बियाणे व निविष्ठांची मोठी खेप बाजारात दाखल झाली आहे.

Team Agrowon

Nagpur News : खरीप हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच अनधिकृत बियाणे व निविष्ठांची मोठी खेप बाजारात दाखल झाली आहे. उमरेड तालुक्‍यातील अंबोली येथे एका अशाच अनधिकृत खत व संप्रेरकांच्या विक्री केंद्रावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापेमारी केली. यात अंदाजे एक लाख ३५ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच एका घटकाकडून सुनियोजित पद्धतीने एचटीबीटीचा प्रसार केला जातो. त्याआधारे शेतकरी हे बियाणे खरेदीसाठी तयार होतात. आतापर्यंतच्या छापेमारीत मोठ्या प्रमाणावर हे बियाणे जप्त करण्यात आले.

याच श्रुंखलेत उमरेड तालुक्‍यात कृषी विभागाला अनधिकृत रासायनिक खते व संप्रेरकाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांच्या मदतीने अंबोली येथील हरीश नागेश्‍वर तोंडे यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली. या कारवाईत निकृष्ट दर्जाचे रासायनिक खत तसेच पीक वाढ संजीवक, संप्रेरके यांचा साठा आढळून आला.

या निविष्ठांची विक्री हरीश तोंडे यांच्याव्दारा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना थेट केली जात होती. एक लाख ३५ हजार रुपये किमतीचा हा साठा जप्त करून हरीश तोंडे यांच्या विरोधात उमरेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, कृषी विकास अधिकारी जयंत कौटकर, तंत्र अधिकारी (गुण नियंत्रण) चंद्रशेखर कोल्हे, पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांच्या मार्गदर्शनात उमरेड तालुका कृषी अधिकारी सोनाली गजबे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक मार्कंड खंडाईत, कृषी अधिकारी जगदीश बेंडे यांनी ही कारवाई केली.

खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर दर्जेदार असल्याचे सांगत बोगस व अनधिकृत खतांचा पुरवठा करणारी टोळी सक्रिय आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी सजग राहत अधिकृत कृषी केंद्रातूनच निविष्ठांच्या खरेदीवर भर द्यावा.
- सोनाली गजबे, तालुका कृषी अधिकारी, उमरेड, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: केळीला उठाव कायम; कापूस दर नरमले, गव्हाला उठाव, गवारचे दर तेजीतच तर मका कणसाचे भाव टिकून

Parliament Monsoon Session 2025: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अमित शाह यांनी मांडलेल्या विधेयकांवर; विरोधकांचा जोरदार निषेध

Sindhudurg Rain: सिंधुदुर्गात संततधार कायम; अनेक भागांत पूरस्थिती

Shirala Rain: शिराळा तालुक्यात पावसाचा जोर वाढला

Kolhapur Heavy Rainfall: कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक मार्ग बंद 

SCROLL FOR NEXT