Illegal Fertilizer Sale : अनधिकृत खते विकणारे दोघे पोलिसाच्या ताब्यात

Fertilizer Black Market : अनधिकृत खताची विक्री करणाऱ्यांसह दोन कंपनीचा जबाबदार व्यक्ति मिळून पाच जणांविरुद्ध शनिवारी (ता. १७) पाचोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
Illegal Fertilizer Sale
Illegal Fertilizer SaleAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : अनधिकृत खताची विक्री करणाऱ्यांसह दोन कंपनीचा जबाबदार व्यक्ति मिळून पाच जणांविरुद्ध शनिवारी (ता. १७) पाचोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून संबंधितांकडून अनधिकृत खताच्या 20 बॅगा जप्त करण्यात आल्या आहेत.

माहितीनुसार, की शनिवारी (ता.१७) छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे खत निरीक्षक तथा तंत्र अधिकारी आशीष काळूशे यांना कडेठाण (ता. पैठण) येथील शेतकरी प्रभाकर मुळे यांनी त्यांच्याकडे अनधिकृत खताची विक्री चालू असल्याची माहिती फोनवरून दिली.

Illegal Fertilizer Sale
Fertilizer Supply : अकोल्यात डीएपी, युरियाचा पुरवठा तुलनेने कमीच

ही माहिती मिळताच श्री. काळुशे यांनी छत्रपती संभाजीनगरचे खते निरीक्षक तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक हरिभाऊ कातोरे यांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर ते जिल्हा पथकातील मोहीम अधिकारी पंकज ताजने, पैठण पंचायत समितीचे कृषी अधिकारी संतोष जाधव हे दुपारी कडेठाण खुर्द (ता. पैठण) येथे हजर झाले.

श्री. मुळे यांनी त्यांना खत रमाकांत विश्वकर्मा आणि इंद्रजित यादव दोघे (रा. उत्तर प्रदेश) यांनी शुक्रवारी (ता. १६) वाहनाद्वारे आणून दिल्याची माहिती दिली. संबंधिताने हे खत १०:२६:२६ या खतांला पर्याय असून हे खत स्वस्त व त्याचा परिणाम चांगला असल्याचे सांगितल्याचे ते म्हणाले.

Illegal Fertilizer Sale
Fertilizer Linking : खत लिकिंगबाबत कारवाईच्या सूचना

राहिलेल्या ११ गोण्याचे ११ हजार रुपये घेण्यासाठी रमाकांत विश्वकर्मा व इंद्रजित यादव हे शनिवारी (ता. १७) आले असता या दोघांना ग्रामस्थांसह खते नियंत्रण व गुणवत्ता पथकाने ताब्यात घेत पाचोड पोलिसात दिले. संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी रमाकांत विश्वकर्मा व इंद्रजित यादव यांना खतासंबंधी विचारणा केली असता त्यांनी खत हे धर्मेंद्र विश्वकर्मा यांनी आम्हास विकण्यास दिल्याचे सांगितले.

मात्र, त्यांचे कोणताही विक्री परवाना व बिल, इतर कागदपत्रे आढळून आले नाही. खत निरीक्षक तथा तंत्र अधिकारी श्री.काळुशे यांनी पूर्वी क्रॉप इंडिया, निजामपुर यांना संपर्क साधून त्यांच्याकडून परवण्याची प्रत उपलब्ध करून घेतली, त्याचे अवलोकन केले असता त्यात कॅरिअर बेसड कॉन्सरशिया या खताचा समावेश असल्याचे आढळून आले.

तपासणीत खत हे सुप्रिम कामधेनू फर्टिलायझर कोसांबा, तहसिल मंगरोल, जि. सूरत (गुजरात) कंपनीने तयार केल्याचे व पूर्वी क्रॉप इंडिया, निजामपुर (ता. साक्री, जि. धुळे) विपणनकर्ता असल्याचे आढळले. खताचे एकूण तीन नमुने कॅरिअर बेसड कॉन्सरशिया, फोस्फो जिप्सम, कॅल्शियम ६ टक्के मॅग्नेशियम २ टक्के व सल्फर ४ टक्के या तीन तपासणीसाठी काढण्यात येऊन प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले.

यावेळी संबंधितांनी विक्री केलेल्या २० गोण्या प्रती गोणी किंमत रुपये १४५० प्रमाणे एकूण २९ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून त्यापैकी साडेतीन गोण्या खत नमुने तपासण्यासाठी घेतले तर उर्वरित साडेसोळा बॅगा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या. खते निरीक्षक तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक हरिभाऊ कातोरे यांच्या तक्रारीवरून पूर्वी क्रॉप इंडिया व सुप्रिम कामधेनू फर्टिलायझर कोसांबाचे जबाबदार व्यक्ती तसेच धर्मेंद्र विश्वकर्मा, रमाकांत विश्वकर्मा, इंद्रजित यादव यांचे विरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. रमाकांत विश्वकर्मा व इंद्रजित यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com