Cold Storage  Agrowon
ॲग्रो विशेष

Cold Storage Subsidy : ‘एकात्मिक’मधून मिळणार शीतगृहासाठी अनुदान

Integrated Horticulture Development Programme : ‘‘एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम २०२४-२५’ अंतर्गत जिल्ह्यास शीतगृह-कोल्ड स्टोअरेज या घटकास मान्यता प्राप्त झाली आहे.

Team Agrowon

Solapur News : ‘‘एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम २०२४-२५’ अंतर्गत जिल्ह्यास शीतगृह-कोल्ड स्टोअरेज या घटकास मान्यता प्राप्त झाली आहे. या घटकांतर्गत खर्चाच्या ३५ टक्के अनुदान देण्यात येते.

जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांनी शीतगृह–कोल्ड स्टोअरेजसाठी महाडीबीटी पोर्टल https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत,’’ असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने यांनी केले आहे.

या शीतगृहाचे उभारणीचे तीन प्रकार असून घटक, मापदंड, कमाल मर्यादा व अनुदानासाठी प्रामुख्याने काही नियम आहेत. त्यात नवीन शीतगृह उभारणीच्या पहिल्या प्रकारात ज्यात एकसारख्या तापमानात राहणाऱ्या उत्पादनासाठी प्रतिचेंबर २५० टनापेक्षा जास्त क्षमता ठेवावी लागणार आहे,

तर दुसऱ्या प्रकारात एकापेक्षा अधिक उत्पादने व तापमानासाठी प्रतिचेंबर २५० टनापर्यंत, तर तिसऱ्या प्रकारात नियंत्रित वातावरणासाठी नविन तंत्रज्ञान राबविणे ज्याची क्षमता प्रतिचेंबर २५० टनापर्यंत ठेवावी लागणार आहे.

योजनेच्या लाभाचे निकष

‘‘शेतकरी, शेतकरी उत्पादक गट, भागीदारी संस्था, मालकी संस्था, नोंदणीकृत स्वयंसाह्यता गट, नोंदणीकृत उत्पादक संघ (ज्यामध्ये कमीत कमी २५ सदस्य असतील), शेतकरी उत्पादक कंपनी किंवा वैयक्तिक शेतकरी, भागीदारी संस्था, मालकी संस्था, नोंदणीकृत स्वयंसाह्यता गट (ज्यामध्ये किमान १५ सदस्य असतील), शेतकरी उत्पादक कंपनी, कंपनी, शेतकरी गट यांच्यासाठी अर्थसाह्य हे बँक कर्जाशी निगडित असून बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरूपात अनुदान मिळेल,’’ असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parliament Winter Session 2025: 'मनरेगा'चे नाव बदलण्यावरुन विरोधक आक्रमक, संसद परिसरात सलग दुसऱ्या दिवशी निदर्शने

Kardai Mava Kid: करडईवरील काळ्या माव्याचं नियंत्रण कसं कराल?

Animal Health Care: मोबाइल पशुवैद्यकीय रुग्णवाहिका ठरतेय फायदेशीर

Hapus Mango Butter: हापूसच्या कोयींपासून तेल अन् मँगो बटर

Climate Crisis: करे कोई, भरे कोई...!

SCROLL FOR NEXT