Farmer Struggle: दिवाळीनंतर राज्यातील शेतकरी आता रब्बीच्यातयारीला लागला आहे. सप्टेंबरमधीलअतिवृष्टी खरीप हंगामातील सोयाबीन कापसाचे इतरही पिकांचे अतोनात नुकसान झाले. दिवाळीपूर्वीच अतिवृष्टिग्रस्तांना मदतीच्या घोषणा झाल्या. परंतु फारच कमी शेतकऱ्यांना अत्यंत तुटपुंची मदत मिळाली आहे. या रब्बी हंगामासाठी जमिनी लागवड योग्य करणे हे दुसरे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. काही शेतकऱ्यांच्या जमिनी पूर्ण खरडून गेल्याने त्या लागवड योग्य होण्यास बराच वेळ लागणार आहे. .खरडून न गेलेल्या जमिनीवर आदळणी पाणी झाल्याने त्या दबल्या असून त्यांची मशागत करणेही फारच जिकिरीचे ठरत आहे. शिवाय सातत्याच्या पावसाने जमिनीत तणे खूप वाढली आहेत. रोजगार हमी योजनेतून जमिनी लागवड योग्य केल्या जातील, असे मदतीच्या पॅकेजमध्ये म्हटले आहे. परंतु तशी कामे कोठे सुरू असल्याचे अजून तरी ऐकिवात नाही..Save Soil: माती आणि मानवी सभ्यता.एकंदरीतच काय तर सप्टेंबरमधील अतिवृष्टीनंतर जमिनी तासावर आणण्यासाठी शेतकऱ्यांचे कष्ट आणि खर्चही वाढणार आहे, हे मात्र नक्की! एक इंच मातीचा थर तयार व्हायला हजारो वर्षे लागतात. असे असताना वादळ-वारे, पाऊस-पाणी-पूर यामुळे दरवर्षी लाखो एकर जमिनीची धूप होऊन त्या नष्ट होत आहेत. नाही तर पीक लागवडीसाठी अयोग्य ठरताहेत. याची सर्वाधिक झळ शेतकऱ्यांना बसत आहे..देशातील ६० टक्के जमीन अयोग्य व्यवस्थापनाने खराब झाली असल्याचे १९४० च्या दशकात कोरडवाहू शेतीचे गाढे अभ्यासक नारायण कानिटकर यांनी सांगितले होते. तेव्हापासून आपले शेती-मातीचे अयोग्य व्यवस्थापन चालूच आहे. त्यामुळे आज आपल्या शेतीची काय परिस्थिती झाली असेल, त्याचे कुठेही नीट मोजमाप नाही. आपण आजपर्यंत शेतीत पाण्यालाच महत्त्व देत आलो आहेत, आजही देतोय आणि पिकांचा मुख्य आधार माती दुर्लक्षितच राहिली आहे..Soil Conservation: आता तरी श्रीमंत करा माती!.मागील आठ दशकांत जमीन सुधारणेबाबत देशात काही कायदे करण्यात आले, निर्णय घेतले. परंतु हे सर्व कागदावरच राहीले आहेत. त्यामुळे कमी पाऊसमानामुळे कुठे जमिनीचे वाळवंटीकरण होत आहे, तर कुठे अति पावसाने मातीची धूप होऊन ती पेरणीयोग्य सुद्धा राहत नाही, हे वास्तव आपल्याला स्वीकारावेच लागेल. राज्यात जमिनीचे खोल, मध्यम खोल आणि हलकी व उथळ असे तीन प्रकार आढळतात. जमिनीच्या या तिन्ही प्रकारची सध्या काय अवस्था आहे, याचा नव्याने अभ्यास करून त्यानुसार पीकपद्धतीचे नियोजन शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे..राज्यातील काळ्या चिकणमातीच्या जमिनीला सुकल्यावर खूप भेगा पडतात. पिकांची मुळे तुटतात. त्यामुळे मातीत ओल असूनही पिकांना पाणी वापरता येत नाही. खोल जमिनीत पिकांना १९ ते २४ टक्के पाणी उपलब्ध होते तर हलक्या मातीत हे प्रमाण फक्त ११ टक्के आहे. आपल्या राज्यात सिंचनाची सोय असेल तर एकाच शेतात तिन्ही हंगामांत व्यापारी पिके घेतली जातात. नाहीतर शेतात वर्ष-दीड वर्ष राहणारे ऊस, केळीसारखी पिके घेतली जातात. त्यात पाण्याचा अनियंत्रित वापरही होत असल्याने जमिनी खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा जमिनीची तीन वर्षांत एकदा खोल नांगरट करावी..त्यात सेंद्रिय खतांचा वापर भरपूर करावा. कंटूर बंडिंग करून जमिनीचा पोत सुधारल्यावरच पिके घ्यावीत, अशा सूचना फार पूर्वी करण्यात आल्या आहेत, पण अमलात कोण आणणार, हा प्रश्न आहे. माती जिवंत ठेवायची असेल तर प्रथमतः जमिनीची होणारी धूप थांबविण्याबाबतचा व्यापक कार्यक्रम शासनाने राबवायला हवा. या कार्यक्रमात थेट शेतकऱ्यांना सहभागी करुन त्यांच्या शेतातून एकही मातीचा कण बाहेर गेला नाही पाहिजेत, असे उपचार त्यांना द्यायला हवेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.