पाच वर्षांत महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्यातून ३,६५३ कोटी मिळालेनैसर्गिक आपत्ती, प्रतिकूल हवामान परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक नुकसानीपासून ही योजना संरक्षण देते २०२४-२५ मध्ये महाराष्ट्रात ९२.३२ लाख गाठी कापसाचे उत्पादन .Maharashtra Cotton Farmers: पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत (PMFBY) २०२० ते २०२४ दरम्यानच्या गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकूण ३,६५३ कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या पिकांसाठी आणि क्षेत्रांसाठी पेरणीपूर्वी ते काढणी पश्चात पीक नुकसान झाल्यास व्यापक विमा संरक्षण दिले जाते..नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल हवामान परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक नुकसानीपासून संरक्षण देणारी ही योजना आहे. विशेषतः या पीक विमा योजनेसाठी विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून दावे दाखल करण्यात आले होते. अनियमित पाऊस आणि हवामानाच्या आव्हानात्मक परिस्थितीत वारंवार होणाऱ्या पीक नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना दिली जाते. .Cotton Rate: सेलू बाजार समितीत पाडव्याला कापसाला सरासरी ७१५० रुपये दर.कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केलेल्या दाव्यानंतर पंतप्रधान पीक विम्याचे २०२० मध्ये ५५.२६ कोटी, २०२१ मध्ये ४४१.१० कोटी, २०२२ मध्ये ४५६.८४ कोटी, २०२३ मध्ये १,९४१.०९ कोटी आणि २०२४ वर्षात ७५८.९५ कोटी रुपये मिळाले आहेत..Cotton Price: खानदेशात कापसाला फटका.२०२४-२५ मध्ये विक्रमी कापूस खरेदी२०२४-२५ मध्ये महाराष्ट्रात ९२.३२ लाख गाठी कापसाचे उत्पादन झाले. याआधीच्या वर्षात हे उत्पादन ८०.४५ लाख गाठी (एक गाठी म्हणजे १७० किलो) एवढे होते. .'सीसीआय'कडून १४४.५५ लाख क्विंटल कापूस खरेदीजळगाव आणि यवतमाळ सारख्या प्रमुख उत्पादक जिल्ह्यांमध्ये भारतीय कापूस महामंडळाने (CCI) १२८ खरेदी केंद्रे सुरु केली आहेत. यात जळगाव येथील ११ आणि यवतमाळमधील १५ केंद्रांचा समावेश आहे. सीसीआयने शेतकऱ्यांशी ६.२७ लाख व्यवहार केले आहे. याद्वारे १०,७१४ कोटी रुपयांचा १४४.५५ लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे. यवतमाळ येथून २१.३९ लाख क्विंटल आणि जळगाव जिल्ह्यातून ४.७९ लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.