Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Water Management : उजनी धरणातील पाण्याचे काटेकोर नियोजन

Ujani Dam Water Capacity : दरवर्षी उन्हाळा संपेपर्यंत सोलापूर शहरासाठी तीन तर शेतीसाठी दोन आवर्तने आणि बाष्पीभवन व इतर पाणीपुरवठ्याच्या योजनांसाठी एकूण किमान ५० टीएमसी पाण्याची गरज लागतेच.

सुदर्शन सुतार

Solapur News : उजनी धरणात सद्य:स्थितीत एकूण पाणीसाठा ९५ टीएमसी असून त्यात उपयुक्त साठा ३२ टीएमसीपर्यंतच आहे. दरवर्षी उन्हाळा संपेपर्यंत सोलापूर शहरासाठी तीन तर शेतीसाठी दोन आवर्तने आणि बाष्पीभवन व इतर पाणीपुरवठ्याच्या योजनांसाठी एकूण किमान ५० टीएमसी पाण्याची गरज लागतेच.

गतवर्षी उजनी पूर्ण भरलेले असतानाही धरणाची पातळी उणे ३६ टक्क्यांपर्यंत खाली गेली होती. यावर्षी तर धरण ६० टक्क्यांपर्यंतच असल्याने संभाव्य पाणी टंचाईचा अंदाज घेऊन उजनीतील पाण्याचे काटेकोर नियोजन आता करावेच लागणार आहे.

सोलापूर, पुणे, नगर या जिल्ह्यांना उजनीचा प्रमुख आधार आहे. पंढरपूर, बार्शीसह जिल्ह्यातील १०० हून अधिक ग्रामपंचायतींनाही उजनीचेच पाणी जाते. सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळ दूर करण्यात शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचावण्यात उजनीचा मोठा वाटा राहिला आहे.

परंतु, नियोजनाअभावी उजनी बहुतेकवेळा पावसाळ्यात १०० टक्के भरूनही ऐन उन्हाळ्यात धरण उणेच राहिले. गतवर्षी उजनी उणे गेल्याने यंदा जुलै-ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांना पाण्याची गरज असतानाही पाणी सोडले गेले नाही.

सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडण्यापूर्वी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून औज बंधाऱ्यात पाणी आणता येईल का, याची चाचपणी झाली. मात्र, अद्याप त्यासंबंधीची कार्यवाही सुरु झालेली नाही. या पार्श्वभूमीवर अवास्तव मागणी टाळून उजनीतील पाण्याचे काटेकोर नियोजन करावेच लागणार आहे, अन्यथा पुन्हा जिल्ह्याला टंचाईच्या झळा सोसाव्या लागतील, असे जाणकारांचे मत आहे.

उजनीतील पाण्याचे संभाव्य नियोजन...

कॅनॉल, बोगदा व उपसा सिंचनमधून एकावेळी आठ टीएमसी पाणी सोडावे लागते.

सोलापूर शहरासाठी तीन आवर्तने सोडली जातात आणि त्यासाठी १८ टीएमसी पाणी सोडले जाते.

धाराशिव, कर्जत-जामखेड, बारामती, इंदापूरसह इतर योजना व ‘एमआयडीसीं’साठी अंदाजे १० टीएमसी पाणी सोडावे लागते.

पंढरीच्या पांडुरंगाच्या आषाढी वारीनिमित्त २ टीएमसी पाणी सोडले जाते.

कडक उन्हाळ्यात बाष्पीभवनामुळे उजनी धरणातील तब्बल आठ टीएमसी संपते.

१५ ऑक्टोबरपर्यंतचा धरणातील पाणीसाठा गृहीत धरून पुढील वर्षीचे विशेषतः उन्हाळ्यातील नियोजन केले जाते. कालवा सल्लागार समितीत त्याचे नियोजन निश्चित होते. यंदा पाणी जपून वापरावेच लागेल.
- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Aster Flower Farming: रंगबिरंगी आकर्षक ॲस्टरची लागवड

Pulses Production: कडधान्ये उत्पादन वाढीसाठी ६ वर्षांचा रोडमॅप तयार, अतिरिक्त ३५ लाख हेक्टरवर लागवडीचे लक्ष्य, २ कोटी शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Hurda Varieties: हुरड्यासाठी ज्वारीचे सुधारित वाण

Raigad Crop Loss: रायगडमध्ये अतिवृष्टीने पिकांची नासाडी

Flood Relief: अतिवृष्टीग्रस्त ७१२ कुटुंबांना शासनाकडून मदत जाहीर

SCROLL FOR NEXT