Pomegranate Orchard Management Agrowon
ॲग्रो विशेष

Pomegranate Management : डाळींब लागवडीत आंबिया बहराचे काटेकोर नियोजन

Pomegranate Farming : खुनेश्‍वर (ता. मोहोळ) येथील विजयसिंह चव्हाण यांची ३० एकर शेती. त्यापैकी अडीच एकरांत डाळिंब लागवड आहे. उर्वरित क्षेत्रावर द्राक्ष, ऊस, कांदा, सोयबीन, मका इत्यादी पिके ते घेतात.

Team Agrowon

Pomegranate Crop : खुनेश्‍वर (ता. मोहोळ) येथील विजयसिंह चव्हाण यांची ३० एकर शेती. त्यापैकी अडीच एकरांत डाळिंब लागवड आहे. उर्वरित क्षेत्रावर द्राक्ष, ऊस, कांदा, सोयबीन, मका इत्यादी पिके ते घेतात. त्यांनी ११ एकरांत द्राक्ष, ६ एकरांत ऊस, ६ एकरांत कांदा लागवड केली आहे. याशिवाय ते शेळीपालन, गांडूळ खतनिर्मिती आदी पूरक व्यवसायही करतात.

सिंचनासाठी विहीर, बोअरवेलमधील पाण्याशिवाय त्यांनी संरक्षित सिंचनासाठी ५ कोटी लिटर क्षमतेचे शेततळेदेखील उभारले आहे. गेल्या पाच वर्षांपासून विजयसिंह डाळिंब शेती करत आहेत. बागेत प्रामुख्याने आंबिया बहरातील फळांचे उत्पादन घेतले जाते. या वर्षीही आंबिया बहरमध्ये उत्पादन घेण्याचे नियोजन केले आहे. त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे.

डाळींब लागवड
२०१९ मध्ये विजयसिंह यांनी अडीच एकरांत डाळिंबाच्या भगवा वाणाची लागवड केली आहे.
साधारण १२ बाय ८ फूट अंतरावर डाळिंबाची ७०० झाडे आहेत.
दरवर्षी बागेत आंबिया बहर धरला जातो.
एकरी साधारण १० ते १२ टनांपर्यंतचे डाळींब उत्पादन मिळते.
मागील १० दिवसांतील कामे
ठिबकद्वारे ०ः५२:३४ आणि ००:००:५० या विद्राव्य खतांच्या ५ किलो प्रति आठवडा प्रति एकर प्रमाणे मात्रा दिल्या आहेत. सोबतच पोटाशिअम शोनाइट ७ किलो प्रमाणे एक वेळा मात्रा दिली आहे.

काडीमध्ये गर्भधारणा चांगल्या पद्धतीने होण्यासाठी दोन फवारण्या घेतल्या आहेत. तसेच ॲमिनो ॲसिड आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांसह सिलिकॉनची एक फवारणी घेतली आहे. बिव्हेरिया बॅसियाना, मेटाऱ्हायझियम आणि व्हर्टिसिलियम यांच्या एकत्रित दोन फवारण्या घेतल्या आहेत.
सध्या बागेमध्ये काडी व्यवस्थित तयार होत आहे. त्यात अन्नद्रव्यांचा साठादेखील चांगल्या प्रमाणात झाला आहे.


काडीमध्ये अन्नद्रव्यांचा साठा चांगला झाला तर कळी निघाण्यामध्ये कोणतीही अडचण येत नाही. याशिवाय रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जैविक खते आणि कीटकनाशकांचा वापर करण्यावर भर दिला आहे.

आगामी २० दिवसांतील नियोजन
मागील हंगामामध्ये फळ छाटणीनंतर २३ जानेवारीला पहिले पाणी बागेला दिले होते. त्या वेळी ऑगस्ट अखेरपर्यंत फळांची काढणी सुरू होती. त्याचा परिणाम पुढील नियोजनावर होत गेला. त्यामुळे या वर्षी लवकर पानगळ करण्याचे नियोजन आहे. जेणेकरून फळांची काढणी जून ते जुलै महिन्यात पूर्ण होईल. त्यासाठी पुढील महिन्यात पानगळ करण्याचे नियोजन आहे.
सध्या बागेतील झाडे ताणावर सोडली आहेत.


ताण कालावधीत झाडांवर ०:५२:३४ आणि १३:००:४५ च्या प्रत्येकी दोन फवारण्या घेतल्या जातील. त्यानंतर ०:०:५० च्या दोन फवारण्या घेतल्या जातील. या फवारण्या आठवड्याच्या अंतराने आलटून-पालटून घेतल्या जातील. त्यानंतर इथ्रेलच्या दोन फवारण्या घेतल्या जातील.
झाडाच्या खोडाला बोर्डोपेस्ट लावली जाईल. तसेच बोर्डोची फवारणी घेतली जाईल.

व्यवस्थापनातील बाबी
मागील हंगामातील आंबिया बहराच्या फळांची काढणी जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्ण झाली आहे. काढणी पूर्ण झाल्यानंतर बागेतील गवत काढून बाग स्वच्छ केली.
दोन ओळींमधील जमिनीची रोटर मारून मशागत केली. त्यानंतर चारी मारून घेतल्या.
त्यानंतर प्रति झाड २० किलो शेणखत आणि गांडूळ खताच्या मात्रा दिल्या.


खोडावरील वॉटर शूट काढून खोडाला बोर्डो पेस्ट लावून घेतले.
झाडावरील रोगट फांद्या, फळे काढून त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून घेतली. सर्व बागेची स्वच्छता केली.


झाडांची हलकी छाटणी करून घेतली. त्यामुळे नवीन काडी तयार होण्यास मदत होते.
मुळे, फुले आणि फळांची चांगली वाढ होऊन उत्पादनाचा दर्जा राखण्यासाठी प्रथम ह्युमिक ॲसिड आणि आय.बी.ए. यांचा एकत्रित वापर केला. तसेच जनावरांचे मलमूत्र आणि गांडूळ खताच्या बेडमधील गांडूळ पाणी ठिंबकद्वारे दिले.


त्यानंतर बागेमध्ये ॲझोटोबॅक्टर आणि केएमबी एकरी दोन लिटर तसेच ट्रायकोडर्मा एकरी २ लिटर प्रमाणे वापर केला आहे.
या व्यतिरिक्त सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि स्लरी दर आठवड्याला एकरी ७ लिटर प्रमाणे सोडले जाते.
विजयसिंह चव्हाण, ९६८९३१४१४४
(शब्दांकन ः सुदर्शन सुतार)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Rabbi 2026 : केंद्र सरकारने रब्बीचे हमीभाव केले जाहीर; हरभऱ्याच्या हमीभावात २२५ तर करडईच्या हमीभावात ६०० रुपयांची वाढ

Amravati Farmers: अमरावतीत शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

Nanded Flood Rescue: एसडीआरएफकडून २१ पूरपीडितांचा बचाव 

DA Hike : दिवाळीपूर्वीच सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मोठी भेट; महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ, जाणून घ्या किती वाढला पगार?

Cotton Farmers: कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधार द्यावा 

SCROLL FOR NEXT