Weekly Weather: बहुतांशी जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता
Maharashtra Weather: महाराष्ट्रावर आज (ता.२६) पासून शुक्रवार (ता.३१) पर्यंत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन १००६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. तसेच महाराष्ट्राच्या पूर्व भागावर मंगळवारी (ता.२८) १००४ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब होताच, त्या भागात विजांसह पावसाची शक्यता निर्माण होईल.