Dharashiv News: दोन्ही जिल्ह्यांत ऑगस्ट व सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी सर्व बाजूंनी अडचणीच आला असताना सरकारकडून मिळणारी मदत तोकडी ठरत आहे. यामुळेच अतिवृष्टिग्रस्त व पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्वयंसेवी संस्था व दानशूरांनी पुढे येण्याचे आवाहन सरकारने केले आहे. या आवाहनाला हरताळ फासण्याचे काम सरकारी आणि शेतकऱ्यांची कंपनी असलेल्या महाराष्ट्र राज्य बियाणे उत्पादक महामंडळाने (महाबीज) केल्याचे समोर आले आहे. अतिवृष्टिग्रस्तांना कमी किमतीत हरभरा बियाण्यांची विक्री करणाऱ्या तीन कृषी सेवा केंद्रांचा पुरवठा बारा दिवसांपासून रोखून धरला आहे. .यात लातूर जिल्ह्यातील एक व धाराशिव जिल्ह्यातील दोन विक्रेत्यांचा समावेश असून, दहा दिवसांपासून बियाण्यांची किंमत वाढविण्यासाठी या विक्रेत्यावर दबाव टाकण्यात येत आहे. यामुळे ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांना महाबीजच्या बियाण्यांपासून वंचित राहावे लागत आहे. दोन्ही जिल्ह्यांत ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी व पुराने मोठ्या संख्येने शेतकरी बाधित झाले. यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने मदतीचे पॅकेजही जाहीर केले..Flood Relief: धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तारेवरची कसरत.नुकसान मोठे असल्याने सरकारकडून मिळणारी मदत पुरेशी नाही. यामुळे अनेक स्वयंसेवी संस्था शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. यातून अन्नधान्याचे कीट तर दुभती जनावरे व अन्य मदत शेतकऱ्यांना मिळत आहे. सरकारनेही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले असून अनेक व्यक्ती व संस्थांकडून मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत मदत जमा केली आहे. यातच काही बियाणे विक्रेत्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला असून रब्बीसाठी शेतकऱ्यांना कमी किमतीत हरभरा बियाण्यांची विक्री करण्यास सुरुवात केली..यात मोठी मागणी असलेल्या महाबीजच्या जॅकी हरभरा बियाण्यांचा समावेश आहे. याचे कौतुक करून प्रोत्साहन देण्याऐवजी महाबीजने तीन विक्रेत्यांच्या बियाण्यांचा पुरवठा रोखला आहे. तीनही विक्रेत्यांनी मिळून दोन महिन्यांपूर्वी दोनशे टन बियाण्यांची आगाऊ पैसे भरून मागणी नोंदवली. त्यांना सुरुवातीला साठ टन बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला. विक्रेत्यांनी कमी किमतीत अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे देत असल्याची माहिती मिळताच बारा दिवसांपासून महाबीजकडून उर्वरित बियाण्यांचा पुरवठा थांबण्यात आला आहे. या स्थितीत महाबीजने बियाण्यांसाठी पर्यायी व्यवस्थाही केली नाही. यामुळे ऐन रब्बीच्या तोंडावर बाजारपेठेत महाबीजच्या बियाण्यांचा तुटवडा झाला आहे..Government Support: पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सरकार कटिबद्ध.‘आरएम’कडून चौकशी, तरी काहीच निर्णय नाहीबियाणे पुरवठा रोखल्यानंतर महाबीजच्या परभणी येथील विभागीय व्यवस्थापक (आरएम) जगजितसिंह खोकड यांनी तीनही विक्रेत्यांच्या दुकानाला भेट देऊन चौकशी केली. सर्व विक्रेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र पुढे काहीच निर्णय दिला नाही. त्यांच्या आदेशाची जिल्हा व्यवस्थापकांना प्रतीक्षा आहे. विक्रेत्यांना दररोज आजचा थांबा, उद्या निर्णय होईल, असे निरोप दिले जात असल्याचे विक्रेते शेतकऱ्यांना सांगत आहेत. यामुळे शेतकरी विक्रेत्यांमध्ये वाद होत आहेत. किंमत वाढवण्यासाठी महाबीजकडून विक्रेत्यांवर दबाव टाकण्यामागील कोडे न उलगडणारे आहे. महाबीजचे अधिकारी कोणाच्या फायद्यासाठी कोणाच्या ओंजळीने पाणी पीत आहेत, असा प्रश्न पडत आहे. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात असतानाही सरकारचे खायचे दात आणि दाखवयाचे दात, वेगळे असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे..महाबीजच्या जॅकी हरभरा बियाण्यांना शेतकऱ्यांची मोठी मागणी आहे. यामुळे दोन महिन्यांपूर्वी ८५ टन बियाण्यांची आगाऊ पैसे भरून मागणी केली होती. त्यापैकी वीस टन बियाणे महाबीजने मला दिले. या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासन व जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मदतीचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देऊन कमी किमतीत बियाणे विक्री सुरू केली. त्यामुळे महाबीजने बारा दिवसांपासून उर्वरित बियाण्यांचा पुरवठा थांबवला आहे. महाबीजकडून बॅगमागे आणखी पन्नास रुपये वाढ करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. सध्याच्या विक्री किमतीतही बॅगमागे चांगला नफा मिळतो. त्यामुळे मी किमतीत वाढ करणार नाही.ऋषिकेश लाकाळ, तिरुपती कृषी सेवा केंद्र, मुरुड (ता. जि. लातूर).हा महाबीजचा अंतर्गत विषय असून शेतकऱ्यांनी त्यात डोकावू नये. अनुसूचित व्यापारी प्रथेचा भंग केल्यामुळे तीन विक्रेत्यांचा बियाणे पुरवठा रोखला आहे. महाबीजकडून डिलरला ज्या किमतीत बियाण्यांचा पुरवठा केला जातो, त्यापेक्षा कमी किमतीत बियाणे विक्री करता येणार नाही. त्याचा इतर विक्रेत्यांवर परिणाम होतो. तीन विक्रेत्यांनी कमी किमतीत बियाण्यांची विक्री केली. शेतकऱ्यांना मदत करायची तर बियाणे मोफत वाटप करावेत. कमी किमतीत बियाण्यांची विक्री करता येणार नाही. जगजितसिंह खोकड, विभागीय व्यवस्थापक,.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.