Thanks Giving Festival: अमेरिकेमध्ये ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात मोठ्या प्रमाणामध्ये भोपळे उपलब्ध होतात. त्यामुळे ‘हॅलोविन’ सणामध्ये भोपळा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. अमेरिकेत विविध आकारांत भोपळे उपलब्ध असल्यामुळे त्यावर कोरून नक्षीकाम केले जाते. भोपळ्याला वेगवेगळे आकार देऊन आकर्षक पद्धतीने सजावटीत वापर केला जातो. भोपळा कोरून त्यामध्ये मेणबत्ती लावून घराचे अंगण, शेतातील घरासमोर सजवून ठेवले जाते. ‘थँक्स गिव्हिंग’ सणाच्या काळात देखील जेवणामध्ये भोपळ्यापासून तयार केलेला पाई हा एक पदार्थ पारंपरिक आणि अनिवार्यपणे वापरला जातो..गेल्या काही महिन्यांपूर्वी समाज माध्यमावर एक चित्रफीत प्रसारित झाली होती. चल रे भोपळ्या टुणुक टुणुक... आजीबाईचा भोपळा सापडला. चित्रफितीमध्ये भला मोठा भोपळा कापला होता. आतील बिया आणि गर स्वच्छ करून सहज एक व्यक्ती बसू शकेल अशी जागा भोपळ्यामध्ये तयार करण्यात आली होती, अशी ती चित्रफीत होती. काही महिन्यांपूर्वी मी अमेरिकेमध्ये होतो. साधारण ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेमध्ये भोपळा काढणीचा हंगाम सुरू होतो. पुढे ऑक्टोबरपर्यंत हंगाम सुरू असतो. हंगामाच्याशेवटी म्हणजेच ३१ ऑक्टोबरला साजरा होणाऱ्या अमेरिका आणि युरोपमधील ‘हॅलोविन’ सणामध्ये मोठ्या प्रमाणात भोपळ्यांचे विविध प्रकार आणि आकर्षक कलाकृती दिसू लागतात..Fruit Festival : फळ महोत्सवामुळे शेतकऱ्यांना मिळतेय हक्काची बाजारपेठ.आरोग्यदायी भोपळ्याची बाजारपेठभारतात कद्दू, लाल भोपळा, काशीफळ अशा नावाने साधारण गोल भोपळा ओळखला जातो. भाजीसाठी म्हणून मोठ्या प्रमाणात भोपळा वापरला जातो. याचबरोबरीने रायता, हलवा, पराठा, लोणचे भोपळ्यापासून बनविले जाते. आपल्याकडे गूळ आणि भोपळ्यापासून घाऱ्या हा पदार्थ देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार करतात. अलीकडे पेढा, लाडू असे गोड पदार्थ बनविण्यासाठी भोपळ्याच्या गराचा वापर केला जातो. भोपळ्याच्या गराची पावडर, पिठापासून बिस्किटे, कुकीज निर्मिती केली जाते. भोपळ्याच्या सालीची चटणी देखील बनवतात..आपल्याकडे आठवडी बाजारात भोपळा कापून किंवा तसाच विकला जातो. पूर्ण पिकलेला भोपळा थंड कोरड्या जागेत हवेशीर ठिकाणी साठवून ठेवल्यास जास्त दिवस चांगला राहू शकतो. अर्थात, तो देठ न कापता तसाच ठेवल्यास लवकर खराब होत नाही. भोपळ्यामध्ये अ, क जीवनसत्त्वासह लोह, झिंक आणि मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात आढळते. पचनशक्ती व रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी याचा वापर होत असल्यामुळे जगात सगळीकडे भोपळ्याचा वापर केला जातो. बियांमध्ये देखील तंतुमय घटक मोठ्या प्रमाणामध्ये असतात..त्यामध्ये अँटीऑक्सिडंट, ओमेगा तीन व ओमेगा सहा फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असतात. मूत्रपिंड विशेषतः प्रोस्टेट ग्रंथीचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी भोपळ्याच्या बिया फायदेशीर आहेत. अशा अनेक औषधी गुणधर्मामुळे अलीकडे बियांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये मागणी वाढत आहे. या पिकाच्या लागवडीचा खर्च आणि उत्पादनाचा विचार केला तर शेतकऱ्यांना परवडण्यासारखे आहे. आपल्याकडील भोपळ्याचा गर अमेरिकन भोपळ्यापेक्षा जाड आणि गोडसर आहे. विविध पदार्थ निर्मितीमध्ये वापर तसेच आरोग्यदायक फायदे, कमी कॅलरी यांचा प्रचार समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केला, तर निश्चितपणे भारतामध्ये देखील भोपळा पिकाला कायमस्वरूपी चांगली मागणी तयार होईल, यात शंका नाही..Wild Vegetable Festival : रानभाजी महोत्सवाला उदंड प्रतिसाद.‘हॅलोविन’ सणासाठी भोपळ्यांना मागणीआपल्याकडे पितृपक्षात भोपळ्याची भाजी हमखास असते. गोडसर, सात्त्विक आणि पौष्टिक गुणधर्मामुळे कदाचित आपले पूर्वज त्याचा वापर श्रद्धेने करत आले असावेत. लाल भोपळा हा शुभ मानतात म्हणूनच त्याचा धार्मिक कार्यात वापर होतो. अमेरिकेमध्ये ऑगस्ट ते ऑक्टोबर याकाळात मोठ्या प्रमाणामध्ये भोपळा उपलब्ध होत असल्याने ‘हॅलोविन’ सारख्या सणात भूताप्रेतांच्या आत्म्यांना घाबरविण्यासाठी भोपळा मोठ्या प्रमाणात वापरला जातो..अमेरिकेत विविध आकारात भोपळे उपलब्ध असल्यामुळे त्यावर कोरून नक्षीकाम केले जाते. भोपळ्याला वेगवेगळे आकार देऊन आकर्षक पद्धतीने सजावटीत वापर केला जातो. भोपळा कोरून त्यामध्ये मेणबत्ती लावून घराचे अंगण, शेतातील घरासमोर आवारामध्ये सजवून ठेवले जाते. त्यामुळे भूतप्रेत, मृतात्मे पळून जातात अशी अमेरिकेतील लोकांची पूर्वापार श्रद्धा आहे. ‘थँक्स गिव्हिंग’ सणाच्या काळात देखील जेवणामध्ये भोपळ्यापासून तयार केलेला पाई हा एक पदार्थ पारंपरिक आणि अनिवार्यपणे वापरला जातो..अमेरिकेतील शेतकरी मोठ्या प्रमाणात भोपळ्याचे उत्पादन घेतात. या देशात विविध आकार आणि रंगांमध्ये भोपळे उपलब्ध असतात. भोपळ्याच्या गरापासून सूप, पाई, ब्रेड, केक आणि विविध प्रकारच्या भाज्या बनविल्या जातात. तसेच सॉस, जेली, जॅम आणि आइस्क्रीममध्ये भोपळ्याच्या गराचा वापर केला जातो. मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादित झालेला पल्प कॅनमध्ये भरून त्याचा वापर वर्षभर केला जातो. भाजलेल्या आणि खारवलेल्या बिया स्नॅक म्हणून खातात. भोपळ्याच्या बियांपासून तेल काढले जाते. याचा वापर सॅलड ड्रेसिंग, सूप व इतर पदार्थात केला जातो. त्यापासून ‘पंपकिन स्पाइस’ हा मसाला तयार केला जातो..पर्यटकांसाठी भोपळ्याची शिवारफेरीअमेरिकेत शरद ऋतूमध्ये शेतकरी भोपळ्याचे शेत पर्यटकांना खुले करतात. या ठिकाणी पर्यटक येतात, विविध आकारांचे आणि रंगांचे भोपळे पाहतात, निवडतात आणि विकत घेतात. यास ‘पंपकिन पॅच’ असे देखील म्हणतात. शेतामध्ये अनेक भोपळे विविध पद्धतीने सजवून आकर्षक पद्धतीने मांडलेले असतात. अमेरिकेत शेतकऱ्यांसाठी मोठ्या आकारात भोपळा उत्पादित करण्याच्या स्पर्धा देखील घेतल्या जातात. ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’नुसार सर्वांत मोठा भोपळा इटलीमध्ये उत्पादित झाला होता. त्याचे वजन १,२४७ किलो होते..यंदाच्यावर्षी १४ ऑक्टोबर रोजी कॅलिफोर्निया येथे झालेल्या वार्षिक जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत एका अभियंत्याने त्यांच्या शेतीमध्ये १,०६४ किलोचा भोपळा वाढवून सर्वोच्च पारितोषिक जिंकले आहे. विविध आकारांचे, रंगांचे मोठे भोपळे हे वेगवेगळ्या ठिकाणी भरणाऱ्या कृषी प्रदर्शनात ठेवण्यासाठी वापरले जातात. अमेरिकेतील भोपळा उत्पादक राज्यांचा विचार केला तर दरवर्षी अंदाजे ५४४,००० टनांपेक्षा जास्त भोपळ्याचे उत्पादन घेतले जाते. भारतात देखील चांगले आकर्षक भोपळ्याच्या जाती निवडून त्यांची लागवड वाढवणे आवश्यक आहे. मानवी आहाराच्या बरोबरीने पशू आहारात देखील भोपळा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. पशुपालक शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले तर निश्चितपणे आपल्याकडे भोपळा पीक लोकप्रिय होण्यास मदत होईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.