Nagpur News: माथाडी मंडळाला स्वतःच्या आदेशाचा फेरविचार करण्याचा अधिकार नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले आहे. माथाडी मंडळाकडे असा कोणताही फेरविचाराचा अधिकार महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर हातमजूर (रोजगाराचे नियमन व कल्याण) अधिनियम १९६९ ने प्रदान केलेला नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. .वलसाड डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्यूसर्स युनियन लिमिटेडने (वसुधारा डेअरी) नागपूर व वर्धा जिल्हा माथाडी व असुरक्षित कामगार मंडळाविरुद्ध याचिका दाखल केली होती. या प्रकरणी न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्या संस्थेने काही माथाडी कामगारांनी उत्पादन प्रक्रिया थांबवल्याची तक्रार केली होती..Mumbai High Court : ‘महाराष्ट्र बंद’ पुकारता येणार नाही.त्यानंतर मंडळाने काही आदेश काढले. मात्र नंतर मंडळाने स्वतःच फेरविचार करून १२ कामगारांना वेतनासह सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले. या निर्णयाला संस्थेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. एकदा माथाडी मंडळाने कोणताही आदेश दिल्यानंतर त्याचा फेरविचार करण्याचा अधिकार त्यांना नाही, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले..Mumbai High Court: कायद्याचे राज्य आहे का? तुमचाही जनतेवर प्रभाव.फेरविचार हा केवळ कायद्याने दिलेल्या तरतुदींमधूनच होऊ शकतो, त्याचा समावेश कायद्यात नसतो. माथाडी कायद्यात असा कोणताही अधिकार दिलेला नसल्यामुळे मंडळाने घेतलेला फेरविचाराचा निर्णय बेकायदेशीर ठरतो, असेही न्यायालयाने नमूद केले..उच्च न्यायालयाच्या आदेशाने मंडळाने १२ कामगारांच्या वेतन आणि इतर लाभांबाबत दिलेला आदेश रद्द ठरवण्यात आला आहे. मात्र या कामगारांना इतरत्र रोजगार उपलब्ध करून देता येतो का, याचा विचार चार आठवड्यांत करावा, असेही न्यायालयाने नमूद केले. या निर्णयामुळे माथाडी मंडळाच्या अधिकार क्षेत्राबाबत स्पष्टता आली असून, पुढील काळात अशा फेरविचार केलेल्या आदेशांना कायदेशीर मर्यादा लागू राहतील..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.