Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : जालन्यातील टंचाईग्रस्त १५८ गावांत पाणी उपसाबंदी

Water Crisis : महाराष्ट्र भूजल पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनासाठी विनिमय अधिनियम-२००९ अन्वये वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई भासणाऱ्या गावांचा अहवाल सादर केला आहे.

Team Agrowon

Jalna News : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त १५८ गावांत ३० जून २०२५ पर्यंत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या उद्‍भवावर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या विहिरींमधील पाणीउपसा करण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र भूजल पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनासाठी विनिमय अधिनियम-२००९ अन्वये वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई भासणाऱ्या गावांचा अहवाल सादर केला आहे. त्यात जिल्ह्यातील एकूण १५८ गावे टंचाईग्रस्त दर्शविली आहेत.

त्यामध्ये जिल्ह्यातील जालना तालुक्यातील ४०, जाफ्राबाद तालुक्यातील २६, भोकरदन तालुक्यातील ५४, बदनापूर तालुक्यातील १४ आणि अंबड तालुक्यातील २४ अशा एकूण १५८ गावांचा टंचाई भासणाऱ्या गावांत समावेश करण्यात आला आहे.

पाणीउपसा बंदी आदेशाचा भंग केल्यास महाराष्ट्र भूजल अधिनियम-२००९ मधील तरतुदीनुसार योग्य ती दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार वापरण्यासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी व संबंधित तहसीलदारांना आदेशाद्वारे प्राधिकृत करण्यात आले आहे. तरी टंचाईग्रस्त गावात भूजल अधिनियम-२००९ नुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.- पांडुरंग डोंगरे, कर्जत, ता. अंबड, जि. जालना

दोन वर्षांपासून वाहुनी पाणीच झाले नाही. गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. परिसरातील अनेक गावांत पाणी टंचाई स्थिती बिकट होत चालली आहे.
- जयकिसन शिंदे, वरुडी, ता. बदनापूर, जि. जालना
शेतीला पाणी मिळणे अवघड होऊन बसल. पिण्याचे पाणी प्रचंड कमी झाले. पाणीपुरवठा योजनेचे पाणी आता येतेय पण पुरे पडत नाही. आपापल्या बोअरवेल, विहिरीवरून अनेक जण मिळेल तेवढे पाणी आणून गरज भागवतात.
- पांडुरंग डोंगरे, कर्जत, ता. अंबड, जि. जालना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

SCROLL FOR NEXT