
Yavatmal News: वाढत्या तापमानाबरोबर राज्यातील पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. सात एप्रिलपर्यंत १७८ गावे, ६०६ वाड्यांना २२३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यासाठी शासकीय सोळा आणि खासगी २०७ असे मिळून २२३ टँकरच्या माध्यमातून १४ जिल्ह्यांतील ७८४ गावांतील नागरिकांची तहान भागविली जात आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टंचाईची तीव्रता कमी आहे. वाढत्या तापमानाबरोबर हळूहळू टंचाईची तीव्रताही आता वाढत चालली आहे. प्रकल्पांमध्ये जलसाठा शिल्लक असला तरी काही भागांतील नागरिकांना टंचाईचे चटके बसू लागले आहेत. गेल्या वर्षी टंचाईची तीव्रता अधिक होती त्यामुळे यंदा प्रशासन अलर्ट मोडवर आले.
मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून कामे झाली. त्याचा परिणाम जलपातळीवर झाला. यंदा प्रकल्प, विहिरींची जलपातळी बऱ्यापैकी आहे. त्यामुळे तीव्रता कमी आहे, असे असले तरी काही भागांत टंचाईने डोके वर काढले आहे. गेल्या काही दिवसांत जलपातळी खाली गेल्याने ग्रामीण भागात टंचाईचे चटके बसू लागले आहेत.
वाढत चाललेले तापमान व टंचाई अशा पेचात नागरिक अडकले आहेत. सध्या १४ जिल्ह्यांतील १७८ गावे व ६०६ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सातारा जिल्ह्यात ४०, जालना ३२ तर ठाणे जिल्ह्यात ३० टँकरने नागरिकांची तहान भागविली जात आहे.
नागपूर विभाग ‘टँकरमुक्त’
राज्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्याबरोबरच पाणीटंचाईने अनेक जिल्ह्यांत डोके वर काढले आहे. राज्यातील सर्वच विभागांत टँकर सुरू झाले आहेत. मात्र, नागपूर विभाग अपवाद ठरला आहे. नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांत सात एप्रिलपर्यंत एकही टँकर सुरू नव्हता, हे विशेष.
विभागाचे नाव टँकर संख्या (७ एप्रिलपर्यंत)
ठाणे ४६
नाशिक २२
पुणे ६५
छत्रपती संभाजीनगर ५१
अमरावती ३९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.