Jowar Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Jowar Production : ज्वारी पिकाच्या उत्पादनवाढीची सूत्रे

Jowar Varieties : परभणी मोती, अकोला क्रांती, फुले वसुधा, फुले चित्रा, परभणी ज्योती, फुले रेवती आणि फुले सुचित्रा या पैकी योग्य त्या वाणाची निवड करावी.

Team Agrowon

डॉ. एस. ए. आंबेकर

Jowar Farming :

योग्य वाणाची निवड

परभणी मोती, अकोला क्रांती, फुले वसुधा, फुले चित्रा, परभणी ज्योती, फुले रेवती आणि फुले सुचित्रा या पैकी योग्य त्या वाणाची निवड करावी.

मूलस्थानी जलसंधारणासाठी

पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी पेरणीपूर्वी १० ते १५ दिवस आधी जमिनीत सऱ्या किंवा वाफे करून घ्यावेत. म्हणजे पावसाचे पाणी त्यात साठून ज्वारीसाठी ओलावा साठवला जाईल.

पेरणीचे अंतर

दोन ओळीतील अंतर ४५ सेंमी (१८ इंच) तर दोन झाडातील अंतर १० ते १२ सेंमी ठेवणे गरजेचे. हेक्टरी १० किलो प्रमाणित बियाणे पेरावे.

बीजप्रक्रिया

कणसावरील काणी रोगाच्या प्रतिबंधासाठी पेरणीपूर्वी बियाणास गंधक (३०० मेष पोत) ४ ग्रॅम किंवा थायरम ३ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात प्रक्रिया करावी. खोडमाशीच्या प्रतिबंधासाठी, थायामेथोक्झाम (७० डब्ल्यूएस) २.५ ग्रॅम प्रति किलो प्रक्रिया करावी.

रासायनिक खताचा वापर

पेरणी करताना कोरडवाहू ज्वारीला हेक्टरी ४० किलो नत्र, स्फुरद २० किलो जमिनीत १२ सेंमी खोलीवर पेरून द्यावे. यामुळे उत्पादनात ३० ते ३५ टक्के वाढ होते. ओलितासाठी ८० किलो नत्र + ४० किलो स्फुरद +४० किलो पालाश प्रती हेक्टरी द्यावे. त्यामधील अर्धे नत्र आणि पूर्ण स्फुरद व पालाश पेरणीबरोबर आणि अर्धे नत्र पीक ३५ ते ४० दिवसांचे असताना पाणी पाळीबरोबर द्यावे. ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून संवेदनशील अवस्थेत पाणी दिल्यास उत्पादनात चांगली वाढ होते.

आंतरमशागतीद्वारे ओलावा साठवणूक

रुंद (४५ सेंमी) अंतरावर ज्वारीची पेरणी केल्यास पिकामध्ये कोळप्याच्या मदतीने दोन वेळेस आंतरमशागत करता येते. त्यामुळे निंदणी खर्चात बचत होते. तसेच मातीची धूप आणि पाण्याचा ऱ्हास रोखला जातो.

डॉ. एस. एस. आंबेकर, ७५८८५७१५७८

(लेखक निवृत्त ज्वारी पैदासकार आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Namo Installment : नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते वितरण

Education Innovation: लिहायला लावणारा शिक्षक

Dairy Farming Success : संघर्षाला मिळाला पूर्णविराम

Crop Compensation : देशभरात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचे नुकसान; खरीपातील उत्पादन घटणार?

Sericulture Farming: काटेकोर व्यवस्थापनातून रोखला उझी माशीचा प्रादुर्भाव

SCROLL FOR NEXT