Jowar Cultivation : रब्बी ज्वारी लागवडीसाठी योग्य वाणाची निवड

Jowar Farming : रब्बी ज्वारी लागवडीसाठी योग्य वाणाची निवड याबाबतची माहिती या लेखातून पाहुयात.
Jowar
Jowar Agrowon
Published on
Updated on

डॉ. आदिनाथ ताकटे, डॉ. विजू अमोलिक

Jowar Variety :

सी. एस. व्ही. २२

भारी जमिनीकरिता कोरडवाहू व बागायती जमिनीसाठी शिफारस

पक्व होण्याचा कालावधी ः ११६ ते १२० दिवस

वैशिष्ट्ये

दाणे मोत्यासारखे चमकदार, भाकरीची चव चांगली

खोडमाशीस प्रतिकारक्षम

कोरडवाहू क्षेत्र ः धान्य उत्पादन हेक्टरी २४ ते २८ क्विंटल, कडबा उत्पादन ६५ ते ७० क्विंटल

बागायती क्षेत्र ः धान्य उत्पादन हेक्टरी ३० ते ३५ क्विंटल, कडबा उत्पादन ः ७० ते ८० क्विंटल

फुले पूर्वा (आरएसव्ही २३७१)

प्रसारण वर्ष २०२३

जिरायती भागातील काळ्या जमिनीसाठी शिफारस

पक्वता कालावधी ः ११८ ते १२० दिवस

वैशिष्ट्ये

पाण्याचा ताण सहन करणारा

न लोळणारा

काढणीस सुलभ

पांढरे शुभ्र टपोरे व गोलाकार दाणे

धान्य उत्पादन : हेक्टरी २३.८ क्विंटल. कडबा उत्पादन ः ६९.२ क्विंटल

Jowar
Jowar Production : काकवी - गोड धाटाच्या ज्वारीची!

परभणी मोती

भारी जमिनीकरिता कोरडवाहू व बागायती पेरणीसाठी उपयुक्त

पक्व होण्याचा कालावधी ः १२५ ते १३० दिवस

वैशिष्ट्ये

दाणे मोत्यासारखे, पांढरेशुभ्र चमकदार

खोडमाशीस प्रतिकारक्षम

कोरडवाहू ः धान्य उत्पादन ः हेक्टरी १७ क्विंटल, कडबा उत्पादन ५० ते ६० क्विंटल

बागायती ः धान्य उत्पादन ः हेक्टरी ३२ क्विंटल, कडबा ः ६० ते ७० क्विंटल

फुले रेवती

भारी जमिनीत बागायतीसाठी शिफारस

पक्व होण्याचा कालावधी ः ११८ ते १२० दिवस

वैशिष्ट्ये

दाणे मोत्यासारखे, पांढरे चमकदार

भाकरीची चव उत्कृष्ट

कडबा पौष्टिक व अधिक पाचक

धान्य उत्पादन : हेक्टरी ४० ते ४५ क्विंटल, कडबा ९० ते १०० क्विंटल

पी.के.व्ही. क्रांती

मध्यम ते भारी जमिनीकरिता, कोरडवाहू आणि बागायती पेरणीसाठी उपयुक्त.

पक्वता कालावधी ः १२० ते १२२ दिवस

वैशिष्ट्ये

दाणे मोत्यासारखे चमकदार

भाकरीची प्रत व चव उत्तम

खोडकीड, खोडमाशीला काही प्रमाणात प्रतिकारक

धान्य उत्पादन ः हेक्टरी २५ ते ३० क्विंटल, कडबा ७० ते ७५ क्विंटल.

मालदांडी ३५-१

मध्यम खोल जमिनीत कोरडवाहूसाठी शिफारस

पक्व होण्याचा कालावधी ः ११८ ते १२० दिवस

वैशिष्ट्ये

दाणे चमकदार, पांढरे

भाकरीची चव चांगली

खोडमाशीला प्रतिकारक्षम

धान्य उत्पादन ः हेक्टरी १५ ते १८ क्विंटल, कडबा ६० क्विंटल

Jowar
Rabi Jowar Farming : जमिनीच्या खोलीनुसार पेरा रब्बी ज्वारीचे वाण

लागवड

कोरडवाहू रब्बी ज्वारीची पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत जमिनीत पुरेशी ओल असल्यास करावी.

शक्यतो हस्ताचा पाऊस पडून गेल्यावर म्हणजेच २५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या दरम्यान पेरणी करणे हिताचे आहे. योग्य वेळी पेरणी न झाल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव अधिक होतो.

बीजप्रक्रिया

पेरणीपूर्वी बियाण्यास गंधकाची प्रक्रिया करावी. त्यासाठी १ किलो बियाण्यांस ३०० मेष गंधकाची ४ ग्रॅम प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. त्यामुळे कानी या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होते. गंधकाची प्रक्रिया केल्यानंतर १० किलो बियाण्यांस प्रत्येकी २५० ग्रॅम ॲझॅटोबॅक्टर व पीएसबी या जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.

बियाणे प्रमाण : हेक्टरी १० किलो

पेरणी

ज्वारीची पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने ४५ बाय १५ सेंमी अंतरावर करावी.

पेरणी करताना एकाच वेळी खते व बियाणे स्वतंत्र दोन चाड्यातून पेरावे.

बागायत ज्वारीचे अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी पेरणी ४५ बाय १२ सेंमी अंतरावर करावी.

कोरडवाहू ज्वारीसाठी दोन रोपांत २० सेंमी अंतर ठेवावे.

पेरणीच्या वेळी संपूर्ण नत्र, स्फुरद व पालाश द्यावे.

डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९

डॉ. विजू अमोलिक, (वरिष्ठ ज्वारी पैदासकार)

९४२१५८३५०६ (महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com