Crop Damage In Nashik Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage In Nashik : वादळी पावसाचा मालेगाव परिसराला फटका

poultry farm loss : मागील सप्ताहात मालेगाव तालुक्याला पूर्वमौसमी पावसाने झोडपले होते. त्यामुळे आंबा, शेवगा पिकांसह जनावरांचे गोठे व पोल्ट्री शेडचे मोठे नुकसान झाले होते.

Team Agrowon

Nashik News : मागील सप्ताहात मालेगाव तालुक्याला पूर्वमौसमी पावसाने झोडपले होते. त्यामुळे आंबा, शेवगा पिकांसह जनावरांचे गोठे व पोल्ट्री शेडचे मोठे नुकसान झाले होते. त्यातच आता पुन्हा एकदा गुरूवारी (ता. ८) मालेगाव शहर व परिसराला पावसाने तडाखा दिला.

त्यामुळे सर्वत्र तारांबळ उडाली होती. तर शहराच्या प्रामुख्याने उत्तर पूर्व भागातील शेवगा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

गुरुवारी दुपारनंतर वादळी वाऱ्याने तालुक्याच्या उत्तर पूर्व भागाला मोठा तडाखा दिला. ज्यामध्ये अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर अनेक शेतकऱ्यांचा साठवलेला कांदा भिजला. शेवगा व डाळिंब लागवडीचे पुन्हा नुकसान वाढले आहे. शहर व परिसरात सायंकाळी मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी वादळी वाऱ्यासह सुमारे २० मिनिटे जोरदार सरी कोसळल्या.

अचानक आलेल्या पावसामुळे सायंकाळी कामावरून परतणाऱ्या व रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या तसेच बाजारपेठेतील नागरिकांची धावपळ उडाली. सटाणा नाका भागातील शिवम हॉटेलजवळ पत्रा लागून एक जण किरकोळ जखमी झाला. दरेगाव भागात पावसामुळे नाल्यांना पाणी आले.

पहिल्याच पावसात शहरातील विविध भागातील वीजपुरवठा खंडित झाला. शहर व परिसरात अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्याने दाणादाण उडाली. तर अचानक नगर परिसरातील झोपडपट्टीतील अनेक घरांचे पत्रे वाऱ्यामुळे उडून गेले.

शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. पावसामुळे तीन तास शहराचा वीजपुरवठा खंडित होता. येथील पवारवाडी, शाह प्लॉट, दरेगाव भागातील सय्यद पार्क यासह भागातील रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने चिखलाचे साम्राज्य झाले.

पावसामुळे जिल्हा परिषद शाळा व अचानक नगर परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचले. हे पाणी वाहून जाण्यासाठी काही ठिकाणी भिंत तोडावी लागली.

लागवडी मोठ्या प्रमाणावर बाधित

वाऱ्यामुळे नवीन लागवडी व छाटून फुटलेल्या लागवडी मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्या आहेत. त्यामध्ये अनेक झाडांवर लागलेल्या शेंगा व बहर गळून पडला आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा हंगाम शेवगाव उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुन्हा अडचणीचा ठरला अशी एकंदरीत परिस्थिती आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Water Budgeting: समृद्ध गावशिवारासाठी पाण्याचा ताळेबंद

FPO Success Story: विविध उपक्रमांमधून ‘सातबारा’ कंपनीची आश्‍वासक वाटचाल

Post Harvest Management: काढणीपश्चात तंत्रज्ञानाची सद्यःस्थिती अन् आव्हाने

Spice Business Success: बीटेक पदवीधराचा ‘अष्टगुण मसाले’ ब्रॅंड

Mushrooms Health Benefits: पोषणमूल्ययुक्त आरोग्यदायी अळिंबी

SCROLL FOR NEXT