Rain Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Pre Monsoon Rain : देवळा तालुक्यात वादळी पावसाने दाणादाण

Rain Damage Update : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने नुकसान आहे. यामध्ये प्रामुख्याने चांदवड, दिंडोरी, कळवण व नाशिक तालुक्यांना पावसाने फटका दिला.

Team Agrowon

Nashik News : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने नुकसान आहे. यामध्ये प्रामुख्याने चांदवड, दिंडोरी, कळवण व नाशिक तालुक्यांना पावसाने फटका दिला. त्यातच सोमवारी (ता. १३) देवळा तालुक्यात वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने कांद्याच्या शेड जमीनदोस्त झाले. तर अनेक घरांचे व गोट्यांचे पत्रे उडाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

जिल्ह्याच्या विविध भागांत भारतीय हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार गेल्या तीन दिवसांत पावसाने शेतकऱ्यांची धावपळ उडवली आहे. त्यातच देवळा तालुक्यातील वाजगाव, हंगा वस्ती, मटाने, रामेश्वर या गावात येथे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.

यंदा पाऊस कमी असल्याने या भागात कांदा लागवडी कमी होत्या. शेतकऱ्यांनी कांदा काढणी करून तो चाळीत साठवला होता. मात्र चाळीचे पत्रे उडून गेले. वादळी वाऱ्यासह पाऊस व नंतर गारपीटही काही प्रमाणात झाली. तर ढगाळ वातावरण मंगळवारी (ता. १४) कायम असल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे.

मध्यरात्री वाऱ्याचा वेग अधिक असल्याने अनेक घरांवरील, कांदा चाळीचे पत्रे उडून गेले. काही ठिकाणी साठवलेला कांदा भिजल्याने सडण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आंबा लागवडी केल्या आहेत. या वादळी वाऱ्यात कैऱ्या गळून पडल्या. झाडे जमीनदोस्त झाली.

कांदा शेडचे अधिक नुकसान

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी कांदा व्यापाऱ्यांचे शेड भूईसपट झाले आहेत. त्यामुळे कांद्याचे अधिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसह कांदा व्यापाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना' अशी परिस्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jayakwadi Dam Water Release: मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा, जायकवाडीतून ५ नोव्हेंबरपासून रब्बीतील पहिले आवर्तन

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरमध्ये ४३ हजार शेतकऱ्यांची कोंडी! कर्जमुक्तीची प्रतीक्षा कधी संपणार?

Farmer Loan Waiver : कर्जमाफीचा लाभ आत्तापर्यंत किती पात्र शेतकऱ्यांना मिळाला?

Strawberry Center Ware : थेट शेतातून ग्राहकांच्या हाती! वारे येथे स्वतंत्र स्ट्रॉबेरी केंद्राचे उद्घाटन, पर्यटकांची गर्दी

Farmer Issue: आधार प्रमाणीकरणानंतरही कर्जमुक्ती नाही

SCROLL FOR NEXT