Rain Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Crop Damage : वादळी पावसामुळे पीकहानी सुरूच

Heavy Rain Crop Loss : खानदेशात बुधवारी (ता. ११) रात्री अनेक भागांत वादळी पाऊस झाला. यात घर-गोठ्यांसह पशुधनाची हानी झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात बुधवारी (ता. ११) रात्री अनेक भागांत वादळी पाऊस झाला. यात घर-गोठ्यांसह पशुधनाची हानी झाली आहे. केळी व भाजीपाला पिकांनाही फटका बसला आहे. पाऊस कमी व वादळ अधिक अशी स्थिती होती. यामुळे अनेक गावांतील वीजपुरवठा बंद झाला.

खानदेशात मागील सात ते आठ दिवसांपासून कुठेही अपवाद वगळता पाऊस झाला नाही. उष्णता वाढली होती. कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. तापमानापासून बचावासाठी कापूस, केळी व अन्य पिकांत सिंचनाची काटेकोर कार्यवाही शेतकरी करीत होते. सकाळपासून उन्हाचे चटके बसत होते.

दुपारी तापमानात मोठी वाढ व्हायची. उकाडाही होताच. अशात बुधवारी सायंकाळी ढगांची दाटी झाली आणि रात्री सव्वाआठच्या सुमारास अनेक भागांत पाऊस आला. पाऊस कमी व वादळ किंवा वेगाचा वारा अधिक होता. जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जळगाव, धरणगाव, एरंडोल, भुसावळ, यावल, चोपडा, धुळ्यातील शिंदखेडा, धुळे भागांतही वादळी पाऊस झाला.

पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरूड, लासगाव, जळगाव तालुक्यातील पाथरी, म्हसावद, मोहाडी, आव्हाणे, नशिराबाद व अन्य भागांत वादळी पावसाने विजेचे खांब वाकले. वीजपुरवठा गुरुवारी (ता. १२) सकाळीदेखील अनेक भागांत सुरळीत झालेला नव्हता.

मुख्य रस्त्यांवर मोठे वृक्ष उन्मळून पडले. तसेच अनेक शेतरस्ते गुरुवारीदेखील वृक्ष उन्मळून पडल्याने बंद झाले होते. रस्त्यांवर पडलेले वृक्ष हटविण्याची कार्यवाही गुरुवारी सकाळीच अनेक भागांत ग्रामपंचायती, पालिकांनी सुरू केली. तसेच रात्रभर वीज बंद असल्याने गुरुवारी सकाळी वीजपुरवठा सुरळीत करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली.

पाचोरा तालुक्यात घरगोठ्यांचे नुकसान वादळी पावसात झाले आहे. तसेच केळीची हानीही झाली आहे. जळगाव, चोपडा, यावल, पाचोरा भागांत लहान केळीची पाने फाटली असून, मोठी केळी जमीनदोस्त झाली आहे. काढणी सुरू असलेल्या केळी बागांत अधिकची हानी झाली आहे.

पाऊस फक्त १५ ते १८ मिनिटे होता. परंतु वादळ सुमारे १८ ते २० मिनिटे झाले. यामुळे हानी अधिक झाली आहे. कुठेही पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. यातच शेतकरी पूर्वमशागतीच्या कामात व्यग्र झाले आहेत. कुठेही २० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Agriculture Commissioner Suraj Mandhare : धोरणात्मक बदलामुळे गुणनियंत्रण होणार प्रभावी

Wildlife Conflict: वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांची मान फासात

Environmental Management: इरिओफाइड कोळीचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन

Agarbatti Business: अगरबत्ती उद्योगात तयार केला ब्रॅण्ड

Mission Jalbandhu: रोजगार, जलसुरक्षितेसाठी ‘मिशन जलबंधू’

SCROLL FOR NEXT