Crop Damage
Crop DamageAgrowon

Crop Damage : हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे ७६३ हेक्टर क्षेत्रावर नुकसान

Heavy Rain Damage : वादळामुळे घरे, आखाड्यावरील पत्रे उडून गेले. खरीप पेरणीच्या तोंडावर नुकसान झाले. पंचनामे पूर्ण करून तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली आहे.
Published on

Hingoli News : जिल्ह्यात सोमवारी (ता. ९) रात्री झालेल्या वादळी वारे पावसामुळे ७६३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कळमनुरी व वसमत तालुक्यातील केळी उत्पादक पट्ट्यातील अनेक गावांतील घड उतरणीस आलेल्या केळी बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. हाती आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा, आखाडा बाळापूर, गिरगाव, कुरुंदा महसूल मंडळातील केळी उत्पादक पट्ट्यातील डोंगरकडा, जवळा पांचाळ, डिग्रस बुद्रुक, रेडगाव, वडगाव, दांडेगाव, गिरगाव, परजणा, खाजमापूरवाडी, हिवरा, कुरुंदा आदी गावांतील केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी वारे पावसाचा मोठा तडाखा बसला आहे.

बहुतांश शेतकऱ्यांच्या केळी काढणीच्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी घडाची काढणी सुरू झाली आहे. प्रतिक्विंटल अठराशे ते दोन हजार रुपये दर आहेत. परंतु वादळामुळे झाडे मोडून पडल्यामुळे अपरिपक्व अवस्थेतील तसेच परिपक्व घडांचे नुकसान झाल्याने दर्जावर परिणाम झाला. वादळामुळे घरे, आखाड्यावरील पत्रे उडून गेले.

Crop Damage
Rain Crop Damage : लोहगाव शिवारात वादळी पावसाचा तडाखा

खरीप पेरणीच्या तोंडावर नुकसान झाले. पंचनामे पूर्ण करून तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्ह्यातील २५ मंडलांमध्ये बुधवारी (ता. ११) सकाळी १० पर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस झाला.

Crop Damage
Crop Damage : सिंधुदुर्गात २६ हेक्टरवर नुकसान

सरासरी ११.९ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात १ जूनपासून आजवर सरासरी १९.५ मिमी पाऊस झाला आहे. २४ तासांतील मंडलनिहाय पाऊस (मिमीमध्ये) ः डिग्रस कऱ्हाळे १०, कळमनुरी ३०, वाकोडी २४, नांदापूर ४२, वसमत २५, अंबा ३५.५, हयातनगर ३५.५, हट्टा १९.५, टेंभुर्णी ३१.८, कुरुंदा १५.५, येळेगाव १०.

दीड एकरावर चोवीस केळीच्या झाडांची लागवड केली होती. घड उतरणीस आलेल्या बावीसशे झाडे वादळामुळे मोडून पडली आहेत. आमच्या गावातील दोनशे एकरांवरील केळी बागा उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. विमा मंजूर करावा.
- दत्ता हमदे, डिग्रस बुद्रूक, ता. कळमनुरी, जि. हिंगोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com