Mango Agrowon
ॲग्रो विशेष

Climate Change : शेतकऱ्यांवर ‘वादळी’चे संकट

पांढरा कांदा आणि हापूस आंबा हे रायगड जिल्ह्यातील मुख्य रब्बी पिके असून बदलत्‍या हवामानामुळे दोन पिके मोठ्या प्रमाणात बाधित झाल्‍याने कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Alibag News : दोन दिवस पडलेल्या अवकाळी पावसाने आंबा (Mango), काजूचा (Cashews) मोहर गळून पडला तर पांढरा कांदा भुईसपाट झाला.

पांढरा कांदा आणि हापूस आंबा हे रायगड जिल्ह्यातील मुख्य रब्बी पिके असून बदलत्‍या हवामानामुळे दोन पिके मोठ्या प्रमाणात बाधित झाल्‍याने कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

केवळ चार दिवसात आंबा पिकाचे ४० टक्के नुकसान झाले आहे. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे झाडावर शिल्लक राहिलेल्या फळांचा दर्जा खालावण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे यंदा हापूसचे उत्पादन निम्म्यावर येण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

रायगड जिल्ह्यात आंबा लागवडीखालील एकूण ४२ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी १४ हजार ५०० हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे. यातून दरवर्षी जवळपास २१ हजार ४२४ मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित असते.

मात्र यंदा आंबा उत्पादनात ५० टक्के घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १५,१६ मार्च रोजी आलेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका श्रीवर्धन, मुरुड, अलिबाग या किनारपट्टीवरील तालुक्यांसह माणगाव, तळा, रोहा, पेण तालुक्यांना बसला.

काढणीस तयार झालेल्या पांढरा कांदाही पावसामुळे आडवा झाला. अलिबागमधील पांढरा कांद्या आरोग्‍यदायी असल्‍याने मोठी मागणी असते. त्‍यामुळे कांदा लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे. मात्र वादळी पावसामुळे कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

भाजीपाला, कलिंगडाला फटका

तळा : जिल्‍ह्यात सध्या ढगाळ वातावरण व वादळी पावसामुळे शेतकरी धास्‍तावले आहेत. तळा तालुक्यात भाजीपाला, कडधान्य, कलिंगड आणि आंबा, काजू या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

तालुक्‍यात भात हे एकमेव मुख्य पीक असताना तरुण वर्ग कष्टाच्या जोरावर भाजीपाला, कडधान्य, कलिंगड, कारली, त्याचबरोबर अनेक पिके घेत आहेत. मात्र वादळीच्या संकटात शेतकरी भरडला जात आहे. नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करून भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

नायब तहसीलदारांवर जबाबदारी

शेतकरी नुकसान होत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे करीत आहेत. परंतु संपामुळे महसूल, कृषी विभागाचे कर्मचारीच उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे रखडले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून संपातील कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांचे पंचनामे रखडणार नाही, यासाठी नायब तहसीलदारांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. स्थानिक शेतकऱ्‍यांनीदेखील परिसरातील माहिती तत्काळ देऊन मदत करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.

अलिबाग तालुक्यात वादळी पावसाचे प्रमाण जास्त होते, त्यामुळे पांढरा कांदा भुईसपाट झाला आहे. कांद्याची पात कुजल्‍याने वाढ खुंटली आहे. या पात्यांचा वापर कांद्याच्या माळी विणण्यासाठी केला जातो. व्यवस्थित विणलेल्या माळांना चांगली किंमत येते, तर सुट्या कांद्याला तुलनेने कमी किंमत मिळते.
मधुकर थळे, कांदा उत्पादक, वाडगाव
नुकसानीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आला आहे. फळगळ झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या, एकट्या तळा तालुक्यात १८ हेक्टर क्षेत्रातील आंबा बागायतीचे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे करण्यासाठी सुरुवात केली आहे मात्र संपामुळे मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकलेले नाही.
आनंद कांबळे, विभागीय कृषी अधिकारी-माणगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Winter Livestock Care: थंडीमध्ये जनावरांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

Farmer Demand: शेतकऱ्यांना हेक्‍टरी एक लाख रुपये मदत करा; संभाजी ब्रिगेड

Crop Loss Inspection: अतिवृष्टी, महापुराची केंद्रीय पथकाकडून पाहणी

Farmers Protest: सातबारा कोरा करण्याची घोषणा फसवी

KGS Sugar Mill: केजीएस साखर कारखान्याचे धुराडे पेटणार

SCROLL FOR NEXT