Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Storm Damage Survey : ‘वादळीवाऱ्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा’

Cashew Crop : तापमानवाढीने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील काजू मोहर करपल्यामुळे पहिल्या टप्प्यातील काजू पिकांवर शेतकरी अवलंबून होते. काजू झाडांवर किरकोळ प्रमाणात काजू बी होती.

Team Agrowon

Sindhudurg News : वादळीवाऱ्याने झालेल्या काजूपीक नुकसानीचे तातडीने सयुंक्त पंचनामे करावेत, अशी मागणी वैभववाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि कृषी विभागाकडे केली. बुधवारी (ता. ५) पहाटे वैभववाडी तालुक्यातील काही गावांमध्ये वादळीवाऱ्याने काजू पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

तापमानवाढीने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील काजू मोहर करपल्यामुळे पहिल्या टप्प्यातील काजू पिकांवर शेतकरी अवलंबून होते. काजू झाडांवर किरकोळ प्रमाणात काजू बी होती. परंतु बुधवारी सकाळी साडेसहा ते साडे नऊ या कालावधीत वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली.

खांबाळे, नावळे, करूळ या गावांमध्ये वादळी वाऱ्यांनी काजू पिकांचे अतोनात नुकसान केले. काजूच्या कोवळ्या बिया गळून पडल्या. झाडांखाली कोवळ्या बियांचा खच पडला त्यामुळे अगोदरच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.

डोंगरपायथ्यांशी असलेल्या गावांमध्ये नुकसानीची झळ अधिक बसली आहे. काल अनेक शेतकऱ्यांना बागेत गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात गळ झाल्याचे दिसून आले. हिरवी पाने, काही झाडांच्या फांद्या देखील तुटल्या आहेत.

यासंदर्भात गुरुवारी (ता. ६) काजू उत्पादक शेतकऱ्यांनी वैभववाडी तहसलदार सूर्यकांत पाटील यांची भेट घेतली. वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीचे तातडीने संयुक्त पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT