Onion Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Market : साठवलेल्या कांद्याचा व्यापाऱ्यांना फायदा

Onion Rate Update : चाकणसह राज्य तसेच देशातील घाऊक बाजारात कांद्याला प्रतिकिलोस किमान ३० ते ६० रुपये बाजारभाव मिळत आहे.

Team Agrowon

Chakan News : चाकणसह राज्य तसेच देशातील घाऊक बाजारात कांद्याला प्रतिकिलोस किमान ३० ते ६० रुपये बाजारभाव मिळत आहे. किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीचा कांदा ८० रुपयांपर्यंत येऊन ठेपला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत वाढलेल्या बाजारभावाचा जास्तीत जास्त फायदा कांद्याची साठवणूक केलेल्या व्यापाऱ्यांनाच होताना दिसत आहे.

सध्या देशात दिल्ली व इतर बाजारात जुन्या कांद्याची आवक कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे चांगला दर मिळत आहे. राज्यात नाशिक, चाकण, सोलापूर या बाजारातून कांद्याची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होते. काही महिन्यांपासून बांगलादेशने कांद्यावर आयात शुल्क लावले होते.

त्यामुळे देशातील कांदा बांगलादेशात निर्यात होत नव्हता. बांगलादेशच्या राष्ट्रीय महसूल मंडळाने (NBR) कांद्याच्या आयातीवरील सीमाशुल्क आणि नियामक शुल्क पूर्णपणे मागे घेतले आहे. बांगलादेशाने येत्या १५ जानेवारी २०२५ पर्यंत कांद्याचे आयात शुल्क मागे घेतल्याचे सांगितले जात आहे.

नवीन कांदायेण्यास उशीर...

कांदा डिसेंबर अखेरीस, जानेवारीच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात विक्रीसाठी बाजारात येईल. या वर्षी पावसाने कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यामुळे कांदा लागवडी उशिरा सुरू झालेल्या आहेत. परिणामी नवीन कांदा बाजारात येण्यास उशीर होणार आहे.

बांगलादेशने कांद्यावरील आयात शुल्क हटविल्याने पुढील काळात कांदा उत्पादकांना अधिक भाव मिळेल असे चित्र निर्माण झाले आहे. देशातून कांदा निर्यात श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, दुबई, आखाती देशांत मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे कांद्याला चांगला दर मिळेल. याचा फायदा शेतकरी, व्यापारी, कांदा निर्यातदार कंपन्यांना नक्की होईल.
प्रशांत गोरे पाटील, कांदा निर्यातदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Silage Production : मुरघास बनविताना काय काळजी घ्यावी?

Environmental Management : युवकांद्वारे साधू जल-पर्यावरण शाश्वतता

Poultry Farming : ‘पोल्ट्री’ला हवा मदतीचा हात

Maharashtra Election : निवडणूक काळात लालपरी प्रवाशांसाठी बंद राहणार

Onion Rate : कांदा दरावर केंद्राची बारीक नजर

SCROLL FOR NEXT