Environmental Management : युवकांद्वारे साधू जल-पर्यावरण शाश्वतता

Youth Participation and Water Management Campaign : महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांतील महाविद्यालयीन युवकांना एकत्र करून, युनिसेफ आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र यांच्या सहकार्याने, नोव्हेंबर २०२२ मध्ये एक सामंजस्य करार केला गेला. यामध्ये ‘युवक सहभाग आणि जल व्यवस्थापन’ या संयुक्त अभियानाची अंमलबजावणी सुरू केली गेली.
Water Management
Water Management Agrowon
Published on
Updated on

बालाजी व्हरकट, राहुल गिरी

Water Resource Conservation :

पाणी हे पृथ्वीवरील जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. मानवाच्या इतिहासातील संस्कृती, समाज आणि जीवनशैली या पाण्यावर आधारित आहे. परंतु आज पाणी संकट गंभीर होत आहे. हवामान बदलामुळे पाणी स्रोतांवर गंभीर परिणाम होत आहेत.

तापमान वाढल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन अधिक होणे, खोल खोल विहिरी आणि कूपनलिका खोदल्याने भूजल पातळी खालावणे, पाण्याचा अवाजवी वापर आणि मोठ्या प्रमाणात सांडपाणी निर्मिती, समुद्रातील प्लॅस्टिक चे वाढते प्रमाण या समस्या वाढत आहेत. काही ठिकाणी कमी पावसामुळे दुष्काळाचे प्रमाण वाढले आहे, तर इतर ठिकाणी अधिक पाऊस आणि पुरामुळे पाणी प्रदूषित होऊन आरोग्य संकट निर्माण होत आहे.

या सर्व आव्हानांचा आपणा सर्वांवर कमी अधिक प्रमाणात विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येते आहे. जागतिक तापमान वाढीसोबतच पाणी टंचाईच्या झळा कमी करण्यासाठी पाणी बचत, पाण्याचा पुनर्वापर आणि शाश्वत पाणी वापराची पद्धती अवलंबणे अत्यावश्यक आहे. असे एकात्मिक उपाय राबविण्यासाठी युवकांची भूमिका महत्त्वाची ठरते.

त्यांच्या उत्साही सहभागानेच पर्यावरण संरक्षणाचे कार्य अधिक प्रभावी होईल, अशी धारणा जागतिक आणि स्थानिक पातळीवर वाढत असलेली दिसते आहे. या सापेक्ष भूमिकेतून राज्यातील १३ जिल्ह्यांतील महाविद्यालयीन युवकांना एकत्र करून, युनिसेफ आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र यांच्या सहकार्याने, नोव्हेंबर २०२२ मध्ये एक सामंजस्य करार केला गेला.

Water Management
Digital Water Management : ‘डिजिटल वॉटर मॅनेजमेंट’ उपक्रमाची संकल्पना

यामध्ये, १ मार्च २०२३ पासून Youth Engagement & Water Stewardship - YEWS - युवक सहभाग आणि जल व्यवस्थापन - या संयुक्त अभियानाची अंमलबजावणी सुरू केली गेली. या उपक्रमाला युवकांद्वारे उत्तम प्रतिसाद मिळत असून मार्च २०२३ पासून आजपर्यंत २.५ लाख युवकांच्या व तसेच त्यांच्या कुटुंब आणि समुदाय यांच्या दैनंदिन पाणी बचतीच्या नोंदीनुसार तब्बल १०.५ दशलक्ष घन मीटर पाणी बचत केली आहे,

जी २० लाख लोकांची १७ दिवसांची पिण्याची आणि घरगुती पाण्याची गरज पूर्ण करण्याइतकी किंवा ऑलिम्पिकच्या आकाराचे ४२०० जलतरण तलाव भरण्याइतकी आहे. २.७५ लाख युवकांनी ‘युथ लीडरशिप फॉर क्लायमेट ॲक्शन’ या ऑनलाइन कोर्समध्ये नोंदणी केली असून १.५ लाख युवकांनी हा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण करून त्यांच्या पर्यावरण बदल ज्ञानात वाढ केली आहे.

महाविद्यालयीन युवकांना या अभियानाशी जोडण्यात या अभियानामध्ये समाविष्ट असलेली ‘ग्रीन क्लब’ ही संकल्पना मध्यवर्ती भूमिका पार पाडत आहे. महाराष्ट्र उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, अहिल्यानगर, लातूर, धाराशिव, पुणे, सातारा, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, पालघर व नागपूर या पाणीटंचाई आणि जास्त पाणी मागणी असलेल्या तेरा जिल्ह्यांतील सर्व महाविद्यालयांतील किमान शंभर विद्यार्थ्यांना (समान लिंग गुणोत्तरासह) सामावून घेणारा किमान १०० विद्यार्थी संख्या असलेला ‘ग्रीन क्लब’ स्थापन करणे महाविद्यालयीन अभ्यासक्रमाशी निगडीत उपक्रमाच्या दृष्टिकोनाने अनिवार्य करण्यात आला आहे.

हे सर्व प्रयत्न विश्वविद्यालय अनुदान आयोग (युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन - UGC) च्या पर्यावरणीय शाश्वततेसाठी UGC ‘’ग्रीन कॅम्पस’’ निर्माण करण्यासाठी उपाययोजना आणि शाश्वत संसाधन व्यवस्थापनाच्या दिशेने शिक्षण संस्थांनी करावयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राबविले जात आहेत. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP २०२०) कृतिशील आणि अनुभव आधारित शिक्षणाद्वारे महाविद्यालयीन युवकांना पर्यावरणाच्या संरक्षणाबाबत सजग करण्यात येत आहे.

Water Management
Water Management : जमिनीच्या प्रकारानुसार पाणी व्यवस्थापन

महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, कुटुंब किंवा समाज अशा भिन्न स्तरांवर वावरत असताना विद्यार्थ्यांमध्ये पाणी, ऊर्जा, स्वच्छता, जैवविविधता संरक्षण याबाबत सवयी विकसित होण्यासह पर्यावरणपूरक वातावरण निर्मिती करणे अशा मुख्य उद्देशांसह ग्रीन क्लबची रचना करण्यात आलेली आहे. ग्रीन क्लब सदस्यांद्वारे जल संधारण, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा बचत आणि जैवविविधता संरक्षण उपक्रम यांसह इतर पूरक उपक्रम टप्प्याटप्प्याने व्यापकपणे राबवले जात आहेत.

प्रतिवर्षी नव्याने किमान शंभर विद्यार्थी सदस्यांची नोंदणी, वर्ष एक पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यास ‘ग्रीन एन्थूझिएस्ट’ व दोन वर्ष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यास ‘ग्रीन चॅम्पियन’ या प्रमाणपत्रांसह विद्यार्थ्यांनी विविध स्तरावर युवकांना त्यांचेच म्हणणे मांडणे, धोरणात्मक बदल सुचविणे, समाज माध्यमाच्या द्वारे नैसर्गिक संसाधन बचतीचे संदेश प्रसारित करणे आणि स्थानिक जल संधारण चळवळींना चालना देणे, इत्यादी लक्षवेधी उपक्रम युवकांद्वारे राबविण्यात येत आहेत.

यूनिव्हर्सिटी स्तरावर विद्यार्थी विकास संचालक आणि जिल्हा स्तरावर संपर्क अधिकारी यांनी अभियानाची अंमलबजावणी केली आहे. प्रत्येक ग्रीन क्लबमध्ये एक अध्यक्ष, उपाध्यक्ष, अभियान समन्वयक आणि दस्तऐवज समन्वयक यांची नियुक्ती केली जात आहे. या विद्यार्थ्यांच्या कार्य प्रदर्शनाचे मूल्यांकन आणि उपक्रमांची अंमलबजावणी ग्रीन क्लब समन्वयक प्राध्यापकांच्या नेतृत्वाखाली केली जात आहे.

अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ३०४ तज्ञ प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याच जोडीला उच्च-तंत्र शिक्षण विभागाद्वारे १५५० ग्रीन क्लब समन्वयक प्राध्यापकांची नियुक्ती केली आहे. तसेच हे अभियान यशस्वी राबविण्यासाठी ॲक्वाडॅम, पर्यावरण शिक्षण केंद्र आणि व्हाय वेस्ट या संस्थांतील युवा कार्यकर्त्यांद्वारे सर्वसमावेशक सहयोग केले जात आहे.

२०२५ पर्यंत या अभियानात ७ लाख १० हजार युवकांना सहभागी करून, त्यांना जल-पर्यावरण शाश्वततेसंबंधित समस्यांवर काम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. युनिसेफ, ॲक्वाडॅम, पर्यावरण शिक्षण केंद्र आणि व्हाय वेस्ट या संस्थांच्या सहकार्याने राज्यातील युवकांचे हे अभियान शाश्वत विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलत आहे.

(लेखक बालाजी व्हरकट हे ‘युनिसेफ’चे हवामान, पर्यावरण आणि आपत्ती धोके निवारण अधिकारी तर राहुल गिरी हे ‘ॲक्वाडॅम’चे मराठवाडा विभागीय समन्वयक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com