Maharashtra Election : निवडणूक काळात लालपरी प्रवाशांसाठी बंद राहणार

ST Buses Update : विधानसभा निवडणुकीच्या कामांसाठी बहुतेक जिल्ह्यांमध्ये लालपरीचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे राज्यातील साडेपाचशेहून अधिक बस स्थानकांमधील फेऱ्या विस्कळीत होणार असून प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
ST Buses
ST BusesAgrowon
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणुकीच्या कामांसाठी बहुतेक जिल्ह्यांमध्ये लालपरीचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे राज्यातील साडेपाचशेहून अधिक बस स्थानकांमधील फेऱ्या विस्कळीत होणार असून प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

ST Buses
Diwali ST Passengers : दिवाळीत १५ लाख प्रवाशांनी केला एसटीने प्रवास

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, निवडणूक कामकाजासाठी पुणे विभागातील सव्वापाचशे लालपरी बसगाड्या जिल्हा प्रशासनाने आरक्षित केल्या आहेत.

ST Buses
ST Buses Revenue : दिवाळीत रोज लालपरीच्या उप्तन्नात तीन कोटींची वाढ

जिल्ह्यातील निवडणुकीच्या कामांसाठी कर्मचारी व सामुग्रीची वाहतूक करण्यासाठी लालपरीचा वापर होणार आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांसाठी दोन दिवस लालपरी उपलब्ध होणार नाही. लालपरीसाठी काही दिवसांपूर्वी प्रवाशांनी १९ व २० नोव्हेंबरसाठी केलेले सर्व आरक्षण रद्द करण्यात आले आहे. मात्र, त्याचा परतावा प्रवाशांना दिला जाणार आहे.

लालपरीची बससेवा काही भागांमध्ये २१ नोव्हेंबरलादेखील बंद राहणार आहे. तशा आशयाचे फलक काही बसस्थानकांवर लावले आहेत. ‘‘मतदानाच्या कालावधीत बसगाड्यांमधील प्रवाशांची संख्याही घटते,’’ असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com