Onion Rate : कांदा दरावर केंद्राची बारीक नजर

Onion Update : कांदा दरावर केंद्र सरकारचे बारीक लक्ष असून सध्या किरकोळ बाजारातील कांद्याचे दर स्थिर करण्यासाठी बफर स्टॉकमधील अधिकचा कांदा बाजारात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
Onion Market
Onion MarketAgrowon
Published on
Updated on

New Delhi News : कांदा दरावर केंद्र सरकारचे बारीक लक्ष असून सध्या किरकोळ बाजारातील कांद्याचे दर स्थिर करण्यासाठी बफर स्टॉकमधील अधिकचा कांदा बाजारात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याद्वारे किरकोळ बाजारामध्ये दर स्थिर ठेवण्यासाठी तात्पुरता पुरवठा केला जाणार आहे.

केंद्राच्या उपलब्ध माहितीनुसार, दिल्लीमध्ये कांद्याचे किरकोळ विक्री दर प्रतिकिलो ६७ रुपये इतके आहे. तर देशभरात सरासरी दर ५८ रुपये इतके आहे. त्यामुळे सरकारने बफर स्टॉकमधील कांद्याचा पुरवठा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून सणासुदीचा हंगाम आणि बाजार बंद झाल्यामुळे काही बाजारांमध्ये कांद्याच्या पुरवठ्यातील तात्पुरते अडथळे दूर व्हावेत.

Onion Market
Onion Issue In Election : ‘कांद्या’ची धास्ती सर्वांना

दर स्थिर करण्यासाठी ‘नाफेड’च्या माध्यमातून खरेदी केलेला कांदा दिल्ली येथे दोन व गुवाहाटीसाठी एक रेक पाठविण्याचे नियोजित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बाजारपेठेत कांद्याची उपलब्धता होण्यासाठी रस्ते वाहतुकीद्वारे सुद्धा पुरवठा वाढवण्याचे नियोजन आहे.

तसेच ‘एनसीसीएफ’च्या माध्यमातून रेल्वे व रस्ते वाहतुकीद्वारे कांद्याचा पुरवठा केल्यामुळे उपलब्धता वाढेल असेही म्हटले आहे. या शिवाय सरकारने पंजाब, हरियाना, चंदीगड, हिमाचल, जम्मू आणि काश्मीर, दिल्ली शहरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सोनीपत येथे शीतगृहात ठेवलेला कांदा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

Onion Market
Onion Hording : कांदा साठवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा

कांदा ट्रकद्वारे ग्राहक केंद्रांवर

सरकारने कांदा दर स्थिरीकरणासाठी यंदा ४.७ लाख टन रब्बी कांदा खरेदी करून बफर स्टॉक केला आहे. ५ सप्टेंबर रोजी किरकोळ विक्रीद्वारे ३५ रुपये प्रतिकिलो दराने आणि देशभरातील प्रमुख मंडईंमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीद्वारे सुरुवात झाली होती. बफर स्टॉकमधील खरेदी केलेला दीड लाख टन अधिक कांदा नाशिक व इतर ठिकाणांवरून ट्रकद्वारे ग्राहक केंद्रांवर पाठविण्यात आला आहे.

देशभरातील बाजारांत दरामध्ये चढउतार

आझादपूर मंडईमध्ये कांद्याचे एका आठवड्यामध्ये सरासरी भाव २७ टक्क्यांनी घसरून ४,००० रुपये प्रतिक्विंटल आणि पिंपळगाव बसवंत येथे आठवड्यामध्ये सरासरी भाव ३५ टक्क्यांनी घसरून २,२५० रुपये प्रति क्विंटल झाला आहे. मदनपल्ले (आंध्र प्रदेश) मध्ये आठवड्यामध्ये एकूण आवक २० टक्क्यांनी वाढल्याने सरासरी किंमत २६ टक्क्यांनी घसरून २,८६० रुपये प्रति क्विंटल झाली आहे.

कोलार (कर्नाटक) मध्ये सरासरी भाव २७ टक्क्यांनी घसरून २,२५० रुपये प्रति क्विंटल झाला आहे. बटाट्याच्या अखिल भारतीय सरासरी किरकोळ किमती गेल्या तीन महिन्यांत सुमारे ३७ रुपये प्रतिकिलोवर स्थिर आहेत, असेही सरकारने नमूद केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com