Chankapur Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Chankapur Dam : ‘चणकापूर’चे आवर्तन बंद करा

Water Issue : चणकापूर धरणाने एप्रिलच्या सुरवातीलाच तळ गाठला असून, आठ दिवसांपासून सुरू असलेल्या आवर्तनाला सुमारे २५ गावांतील आदिवासी नागरिकांनी विरोध दर्शविला आहे.

Team Agrowon

Kalvan News : चणकापूर धरणाने एप्रिलच्या सुरवातीलाच तळ गाठला असून, आठ दिवसांपासून सुरू असलेल्या आवर्तनाला सुमारे २५ गावांतील आदिवासी नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. धरणात पाणी न राहिल्यास गुढीपाडवा धरणातच उभारू, अशा इशाराही त्यांनी दिला.त्यामुळे ‘चणकापूर’चे आवर्तन धोक्यात येऊ शकते. एकीकडे दुष्काळ आणि जनतेला पिण्याच्या पाण्याची गरज अशा स्थितीत प्रशासनाचा योग्य मेळ साधण्यासाठी कसोटीच लागणार आहे.

‘धरण उशाशी आणि कोरड घशाशी’ अशी काहीशी परिस्थिती चणकापूर धरणाच्या परिसरातील गावांवर येऊन ठेपली आहे. डिसेंबर २०२३ नंतर ४५ दिवसाचे अंतर न ठेवता आवर्तन सोडले गेल्याचा आरोप येथील शेतकरी व ग्रामस्थांनी केला आहे. चणकापूर धरणाने तळ गाठला असताना पाटबंधारे विभागाकडून कोणत्याही प्रकारे सर्व्हे करण्यात आलेला नाही,

असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कळवण पश्चिम पट्ट्यातील देसगाव, बेंदीपाडा, तिऱ्हळ यांसह सुमारे २५ गावे धरणाच्या मागील बाजूस येतात. पुढील तीन दिवस आवर्तन बंद न झाल्यास धरणात पाण्याचा थेंबदेखील राहणार नाही. आदिवासी गावांचा पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीसह जनावरांनादेखील पाणी राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

माजी आमदार जे. पी. गावित यांनी शेतकऱ्यांसह नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेऊन वस्तुस्थिती कथन केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने मालेगाव पाटबंधारे विभागाचे उपअभियंता ढोके यांनी चणकापूर धरणाला भेट दिली. परंतु पाण्याची पातळी न मोजताच अधिकारी परत गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

खोली न मोजताच परतले

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणाची स्थिती जाणून घेण्यासाठी भेट दिली. मात्र खोली न मोजताच ते निघून गेले. अधिकाऱ्यांची भूमिका स्पष्ट न झाल्यामुळे येथील आदिवासी बांधवांनी अर्धनग्न पाण्यात उतरून पाटबंधारे विभाग, स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचा जाहीर निषेध नोंदवला.

तीन दिवसांत धरण कोरडे झाल्यास परिसरातील सर्व शेतकरी कोरड्या धरणात गुढीपाडवा साजरा करणार असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jayakwadi Dam Water Storage: जायकवाडीत झपाट्याने वाढतोय पाणीसाठा

Farm Loan Waiver: सांगली जिल्ह्यात ५० हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र

Khandesh Rain: खानदेशात तुरळक पावसाची हजेरी

Farm Loan Waiver: बुलडाण्यात कर्जमुक्तीसाठी १२,१०७ शेतकरी ठरले पात्र

Khari Jowar Sowing: मराठवाड्यात केवळ ५,९२५ हेक्टरवर खरीप ज्वारीची पेरणी

SCROLL FOR NEXT