Chankapur Dam : 'चणकापूर'च्या आवर्तनाने शेतीला दिलासा

Agriculture Irrigation : चणकापूर धरणातून शेती व पिण्यासाठीचे संयुक्त आवर्तन सोडण्यात आले. आवर्तनामुळे मालेगावसह 'कसमादे'तील लहान मोठ्या ५२ पाणीपुरवठा योजनांना फायदा झाला.
Chankapur Dam
Chankapur DamAgrowon

Nashik News : चणकापूर धरणातून शेती व पिण्यासाठीचे संयुक्त आवर्तन सोडण्यात आले. आवर्तनामुळे मालेगावसह 'कसमादे'तील लहान मोठ्या ५२ पाणीपुरवठा योजनांना फायदा झाला. तसेच लाभ क्षेत्रातील शेतीला दिलासा मिळाला आहे. संयुक्त आवर्तनाने रब्बी पिकांसह उन्हाळी कांद्याला फायदा होईल. १९ जानेवारीला सोडण्यात आलेले आवर्तन अंतिम टप्प्यात असून शहराला पाणीपुरवठा करणारा तळवाडे साठवण तलाव भरून घेतला जात आहे.

गेल्या वर्षी कसमादेत पुरेसा पाऊस झाला नाही. मालेगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला आहे. कसमादेतील इतर तालुक्यात देखील पाणीटंचाईची परिस्थिती आहे. पाऊस कमी असला तरी माणिकपूंज व नाम्यासाक्या वगळता सर्व धरणे भरली होतो. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे असलेल्या गिरणा धरणात देखील ५५ टक्क्यांवर साठा झाला होता.

Chankapur Dam
Wakurde Yojana : वाकुर्डे योजनेच्या पाण्याची पळवापळवी

चणकापूर, हरणबारी, केळझर, पुनंद ही चार प्रमुख धरणे ओव्हरफ्लो झाल्याने किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला, त्याचबरोबर धरणांमधून आवर्तनाची मागणी वाढली. हरणबारीतून तीन आवर्तने सिंचनासाठी घेण्यात येणार आहेत. यातील पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे.

चणकापूर धरणातून सिंचनासाठी आवर्तन सोडण्याची मागणी सातत्याने करण्यात आली होती. अपुऱ्या पावसामुळे तसेच परतीचा पाऊस देखील कमी प्रमाणात झाल्याने चणकापूरवर अवलंबून असलेल्या विविध पाणीपुरवठा योजनांनी ताण दिला होता. अनेक गावांमध्ये आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.

Chankapur Dam
Ujani Dam Water : पुण्याकडील धरणांतून उजनीत पाणी सोडावे

पाणीपुरवठा योजनांनी दिलेला ताण व शेतकऱ्यांकडून होत असलेली मागणी पाहता १९ जानेवारीला चणकापूरमधून पहिले संयुक्त आवर्तन सोडण्यात आले. यातून विविध पाणीपुरवठा योजनांचे जलसाठे भरून घेतले जात आहेत. दाभाडीसह बारागाव योजनांसाठी वरदान ठरलेल्या शेवाळी नाला तलाव भरून घेण्यात आला आहे. आवर्तनाच्या अंतिम टप्प्यात तलाव भरून घेतला जात आहे. दोन दिवसांत तलाव पूर्ण भरेल.

नदीपात्रात पाणी सोडले जाणार

शेती व पिण्यासाठीचे संयुक्त आवर्तन असल्याने साधारणतः ७०० ते ७५० दशलक्ष घनफूट पाणी गिरणा नदीपात्राद्वारे सोडले जाण्याची शक्यता आहे. गिरणा डाव्या कालव्यातील लाभ क्षेत्रातील शेतीला आवर्तनाचे पाणी मिळत आहे.

यामुळे उन्हाळी कांदा व रब्बी पिकांना दिलासा मिळाला. विहिरीचे पाणी कमी होत असतानाच आवर्तन मिळाल्याने अनेक ठिकाणी पिकांना त्याचा फायदा होईल. आवर्तनामुळे विविध पाणीपुरवठा योजनांचे जलसाठे भरून घेण्यात आले असून आगामी दीड महिना पाणी पुरवावे लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com