VIP Darshan Agrowon
ॲग्रो विशेष

VIP Darshan: पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद करा

Pandharpur Temple: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वशिल्याने (व्हीआयपी) दर्शन तातडीने बंद करा, अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल, असा थेट इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

Team Agrowon

Solapur News: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वशिल्याने (व्हीआयपी) दर्शन तातडीने बंद करा, अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल, असा थेट इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. यासंदर्भात मंदिर समितीला लेखी पत्रच जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

आषाढी यात्रेच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी लाखो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांना दर्शन रांगेत दहा ते बारा तास थांबावे लागत आहे. दर्शनाची रांग गोपाळपूर रोडच्या पुढे गेली आहे. भाविकांना सुलभ आणि जलद पद्धतीने विठुरायाचे दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र तरीही काही राजकीय नेत्यांच्या दबावामुळे अधूनमधून व्हीआयपी लोकांना दर्शनासाठी सोडले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यानंतर जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी थेट मंदिर समितीलाच कारवाईचा इशारा दिला आहे.

आषाढी वारी काळात वशिल्याने (व्हीआयपी) दर्शनासाठी सोडल्याचे निदर्शनास आल्यास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये मंदिर समितीवर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी या पत्रात दिला आहे.

मंदिर समितीने यापूर्वीच व्हीआयपी दर्शन बंद केले आहे. परंतु काही प्रमाणात ते सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानंतर आता जिल्हाधिकारी यांच्या सूचनेचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. एकाही व्यक्तीला व्हीआयपी दर्शनासाठी सोडले जाणार नाही.
- राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT