Farmer Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam : उजनीतून सोडण्यात येणारे पाणी थांबवा

Improper Water Planning : अयोग्य पाणी नियोजनाच्या विरोधातील असंतोष व्यक्त करण्यासाठी इंदापूर दौड, करमाळा व कर्जत तालुक्यांतील शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. १) येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सुमारे दोन तास तीव्र रास्ता-रोको आंदोलन केले.

Team Agrowon

Indapur News : उजनी धरणासाठी शेतकऱ्यांनी घरे, सोन्यासारख्या जमिनी, आस्था असलेल्या मंदिरांवर पाणी सोडले. केवळ राजकीय स्वार्थासाठी धरणातील पाण्याच्या नियोजनाचे तीन तेरा केले आहेत.

अयोग्य पाणी नियोजनाच्या विरोधातील असंतोष व्यक्त करण्यासाठी इंदापूर दौड, करमाळा व कर्जत तालुक्यांतील शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. १) येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सुमारे दोन तास तीव्र रास्ता-रोको आंदोलन केले.

उजनी धरणामधून सोडण्यात येणारे पाणी तत्काळ थांबविण्यात यावे, पुणे जिल्ह्यातील धरणांमधून उजनीमध्ये दहा टीएमसी पाणी तत्काळ सोडण्यात यावे. अन्यथा, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा या वेळी शेतकऱ्यांनी दिली. सध्या उजनी धरणांमध्ये केवळ उणे सहा टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे.

या असंतोषातून गुरुवारी (ता. १) पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्यात आले. उजनी धरणग्रस्त बजाव समितीचे महारुद्र पाटील, अरविंद जगताप, प्रा. रामदास झोळ, शिवाजी बंडगर, पराग जाधव, सविता राजेभोसले, शहाजीराव देशमुख, सुभाष गुळवे, राजेंद्र धांडे, अमोल भिसे, संजय जगताप, नंदकुमार भोसले, शहाजी जाधव, सतीश वाघ, नानासाहेब बंडगर, सचिन बोगावत, उदय राजेभोसले तसेच चार तालुक्यांतील शेतकरी उपस्थित होते.

उजनी धरणग्रस्तांच्या मागण्या

उजनी धरणातून सोडण्यात येत असलेले आवर्तन तत्काळ बंद करावे, पुणे जिल्ह्यातील धरणांतून दोन वेळा दहा-दहा टीएमसी पाणी उजनीत सोडावे, ठोक जलशुल्क आदेश रद्द करावा. सोलापूर शहरासाठीचे समांतर जलवाहिनीचे काम जलदगतीने पूर्ण करावे. कालवा सल्लागार समितीवर चार तालुक्यांतील प्रतिनिधी निवडावेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT