Ujani Dam Water : उजनी धरणातील पाण्याच्या संरक्षणासाठी धरणग्रस्त करणार आंदोलन

Water Crisis : या वर्षी पाऊस कमी पडल्याने उजनी धरण केवळ ६०.६६ टक्के इतकेच भरलेले होते. परंतु अशी स्थिती असताना देखील ३ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत गरज नसताना कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले.
Ujani Dam
Ujani DamAgrowon
Published on
Updated on

Pune News : उजनी धरणातून गरज नसताना सोडण्यात येत असलेले पाणी तत्काळ बंद करणे व उजनीच्या वरच्या धरणातून उजनीत प्रत्येकी दोन वेळा १० टीएमसी पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी इंदापूरसह करमाळा, दौंड, कर्जत तालुक्यांतील धरणग्रस्त गुरुवारी (ता.१) भिगवण येथे रास्ता रोको करणार आहेत. यामुळे आगामी काळात उजनी धरणातील पाण्याच्या प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.

याबाबत इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत उजनी धरणग्रस्तांच्या वतीने महारुद्र पाटील, अंकुश पाडुळे, अरविंद जगताप, बाळासाहेब मोरे, अमोल मुळे, उदय भोईटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली.

Ujani Dam
Ujani Dam : राज्याच्या दोन नंबरच्या मोठ्या धरण पट्ट्यात 'दुष्काळाचं सावट'

या वर्षी पाऊस कमी पडल्याने उजनी धरण केवळ ६०.६६ टक्के इतकेच भरलेले होते. परंतु अशी स्थिती असताना देखील ३ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत गरज नसताना कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले. केवळ १० दिवसांच्या अंतराने दुसरे आवर्तन ११ जानेवारीपासून सोडण्यात आलेले आहे.

सोलापूर शहरासाठी पाणी पिण्याकरिता नदीतून पाणी सोडल्याने सोमवारी (ता. २९) उजनी धरण उणे ०.७६ च्या खाली गेले आहे. त्यामुळे उजनी धरणासाठी त्याग केलेल्या इंदापूर, करमाळा, दौंड, कर्जत आदी तालुक्यांतील मूळ धरणग्रस्तांवर अन्याय होत आहे, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.

Ujani Dam
Ujani Dam : उजनीची पाणी पातळी अखेर उणेपातळीत

धरणग्रस्तांची घरे, जमिनी, गावे पाण्याखाली गाडलेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या हक्काच्या पाण्यावर गदा येता कामा नये. त्यामुळे अनावश्यक चालू असलेले आवर्तन तत्काळ बंद करण्यात यावे. उजनी धरणग्रस्तांसाठी दिलासादायक स्थिती निर्माण होण्यासाठी उजनी धरणाच्या वरील १९ धरणांतील एकूण २० टीएमसी पाणी प्रत्येकी १० याप्रमाणे तत्काळ सोडण्यात यावे.

तसेच कालवा सल्लागार समितीमध्ये करमाळा तालुक्यातील दोन व इंदापूर तालुक्यातील दोन उजनी धरणग्रस्त प्रतिनिधींची निवड करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या पूर्ण न झाल्यास गुरुवारी (ता.१) भिगवण (ता.इंदापूर) येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात असल्याचेही महारुद्र पाटील यांनी या वेळी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com