Ujani Dam Water : पुण्याकडील धरणांतून उजनीत पाणी सोडावे

Yuva Sena Protest Demand on Water : पुणे जिल्ह्यातील धरणांमधून उजनी धरणात दहा टीएमसी पाणी सोडावे, या मागणीसाठी युवा सेनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. २९) शिराळ (टें) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
Yuva Sena Protest
Yuva Sena ProtestAgrowon
Published on
Updated on

Solapur News : पुणे जिल्ह्यातील धरणांमधून उजनी धरणात दहा टीएमसी पाणी सोडावे, या मागणीसाठी युवा सेनेने जिल्हाप्रमुख गणेश इंगळे व सचिन बागल, युवासेना जिल्हा समन्वयक किशोर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. २९) शिराळ (टें) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी माढ्याचे तहसीलदार विनोद रणवरे व टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी निवेदन स्वीकारले.

सध्या उजनी धरण हे उणे पातळीमध्ये गेले असून, उजनी धरणावर अवलंबून असणारी शेती तसेच सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यांतील कर्जत, जामखेड, धाराशिव, सोलापूर, इंदापूर, बारामती शहरांसह सोलापूर जिल्ह्यातील शंभरहून अधिक ग्रामपंचायती व नगरपालिकांचा पाणीपुरवठा उजनी धरणावर अवलंबून आहे.

Yuva Sena Protest
Water Shortage : बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात पाणीटंचाईचे संकट गडद

त्याप्रमाणे सोलापूर व पुणे जिल्ह्यांतील औद्योगिक वसाहतींना उजनी धरणातून पाणीपुरवठा होतो. या सर्व योजनांना पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे. जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्‍नही गंभीर होऊ शकतो. त्यामुळे धरणाच्या वरच्या बाजूला असणाऱ्या भामा आसखेड, कळमोडी व इतर धरणांतून उजनी धरणात दहा टीएमसी पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली.

Yuva Sena Protest
Ujani Dam Water : उजनी धरणातील पाण्याच्या संरक्षणासाठी धरणग्रस्त करणार आंदोलन

पाणी सोडले नाही, तर यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही युवा सेनेच्या वतीने देण्यात आला. या वेळी गणेश इंगळे, सचिन बागल, किशोर देशमुख, महादेव बंडगर, सुरेश लोंढे यांनी मनोगत व्यक्त केले.

‘तेव्हा सोडले, आताही सोडा’

तत्कालीन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी वीस वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील सर्व धरणांमधून उजनीमध्ये दहा टीएमसी पाणी सोडले होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पाणी सोडावे, तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर जिल्ह्यातील आमदार व खासदारांनी त्यासाठी आग्रह धरावा, अशी मागणीही या वेळी इंगळे यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com