Farmers Scam  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Scam: शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा

Fake Fertilizers: कृषी अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांच्या जीवावर उदार खेळ सुरू असून, बोगस कंपन्यांना संरक्षण देत शेतकऱ्यांची फसवणूक सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या किसान सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष हर्षल ठाकरे यांनी केला आहे.

Team Agrowon

Sakri News: कृषी अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांच्या जीवावर उदार खेळ सुरू असून, बोगस कंपन्यांना संरक्षण देत शेतकऱ्यांची फसवणूक सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या किसान सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष हर्षल ठाकरे यांनी केला आहे. याबाबत नाशिकचे कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांना निवेदन देत संबंधित कंपन्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यासह अनेक भागांत काही कृषी अधिकारी स्वतःच्या किंवा नातेवाईकांच्या नावाने खते, बियाणे, संजीवके व बायो कीटकनाशके उत्पादक कंपन्या चालवत आहेत.

हे अधिकारी शासकीय पदाचा गैरवापर करत आहेत. कृषी सहसंचालक श्री. काटकर खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीसाठी साक्री तालुक्यातील शेणपूर येथे आले असता ठाकरे यांनी त्यांच्याकडे कैफियत मांडली. बोगस कंपन्यांद्वारे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरूच असल्याचे ठाकरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

दोनशे रुपयांची खते एक हजारात

खळबळजनक बाब म्हणजे या कंपन्यांमार्फत गुजरात येथून फक्त दोनशे रूपये दराने खरेदी केलेली खते शेतकऱ्यांना हजार रुपये दराने विक्री केली जात आहेत. हा प्रकार म्हणजे थेट शेतकऱ्यांची लूट असून, यामागे कृषी विभागातील तथाकथित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध आहेत का, हे पाहणे आवश्यक असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Seed Treatment: उसाच्या बेणे निर्मितीची सोपी आणि कमी खर्चिक पद्धत, उतिसंवर्धित रोपे का महत्त्वाची?

Summer Crop Sowing: हिंगोली जिल्ह्यात उन्हाळी पिकांच्या पेरणीत ६ हजार ७०२ हेक्टरने घट

Farmers Training Program: जागतिक मधुमक्षिका दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षण

Agrowon Podcast: जांभळाचा भाव तेजीत; सोयाबीन टिकून, कापसात नरमाई, कांदा दबावातच तर आंबा आवक वाढली

El Nino Awareness Campaign: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर गावागावांत जनजागृती

SCROLL FOR NEXT