Village Farmer Meetings: यंदाच्या खरीप हंगामावर एल निनोचे सावट राहण्याची शक्यता व्यक्त होत असून पावसातील अनियमिततेमुळे शेतीपिकांवर परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी योग्य पद्धतीने करावी, यासाठी २५ आणि २६ मे रोजी गावागावांत गावसभा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी समिती सभेत देण्यात आली..जिल्हा परिषद कृषी समितीची सभा सभापती तथा उपाध्यक्ष तुकाराम साईल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी जिल्हा कृषी अधिकारी दिशांत कोळप, सदस्य विजय नाईक, शोभा गावडे, सुजाता पडवळ, अक्षता गावडे, पार्वती गवस, सुयोगी घाडी आदी उपस्थित होते..Agriculture Planning: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार.यंदा एल निनोमुळे पावसात खंड पडण्याची शक्यता असून, पावसाचे गणित बिघडल्यास खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पिकांची निवड, पेरणीचे नियोजन आणि पाण्याचे व्यवस्थापन याबाबत दक्षता घेणे आवश्यक असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले..Kolhapur Administration Planning: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सज्ज ठेवा : जिल्हाधिकारी राठोड.या संदर्भात गावागावांत ग्रामसभा घेऊन कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. २५ आणि २६ मे रोजी होणाऱ्या या सभांमध्ये शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली जाणार आहे..सभेत तुळस आणि मातोंड परिसरात गवारेड्यांकडून शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. जिल्हाभर हा उपद्रव वाढत असून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सदस्यांनी केली..दरम्यान, कृषी विभागाने जिल्हा परिषदेकडे २ कोटी ७३ लाख ६८ हजार ६०० रुपयांच्या अंदाजपत्रकाची मागणी केली होती. मात्र सुधारित अंदाजपत्रकात विभागाला २ कोटी ५ लाख ६८ हजार ६०० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती सभापती तुकाराम साईल यांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.