Market Bulletin: सोयाबीन टिकूनदेशातील बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी सोयाबीनचे भाव स्थिर होते. बाजारातील सोयाबीनची आवकही कमीच आहे. तर दुसरीकडे सोयाबीनला उठाव चांगला आहे. सोयापेंड आणि सोयातेलाचे भाव टिकून आहेत. सोयाबीनच्या भावातील तेजी टिकून आहे. सध्या सोयाबीनला बाजारात प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ते ७ हजार ५०० रुपये भाव मिळत आहे. तर बियाण्याचे सोयाबीन ८ हजार ५०० ते ९ हजारांच्या दरम्यान विकले जात आहे. बाजारातील सोयाबीनची आवक पुढील काही काळ कमीच राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापसात नरमाई आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात नरमाई दिसून आली आहे. कापूस भाव ८० सेंटच्या खाली आले असून ७७ सेंटच्या दरम्यान भाव होते. कच्च्या तेलाचेही भाव कमी झाले आहेत. याचा कापसाच्या मागणीवर परिणाम होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस दराचा देशातील बाजारावरही प्रभाव दिसून आला आहे आणि नरमाई आली. देशातील बाजारात कापसाचा भाव सध्या ८ हजार ५०० ते ८ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहेत. त्यातच कापसावरील ११ टक्के आयात शुल्क काढण्याची मागणी केली जात आहे. याचाही परिणाम होत आहे. यामुळे कापसाच्या भावात काही दिवस काहीसे चढ उतार राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Kolhapur Jaggery Market: कोल्हापूर बाजार समितीत उसाअभावी गूळ आवक घटली.कांदा दबावातचकांद्याला बाजारात कमी भाव कमी मिळत आहे. कांद्याचा किमान भाव आजही १०० रुपयांपासून काही बाजारांमध्ये सुरु होत आहे. उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. कांद्याला सध्या बाजारात सरासरी ७०० ते १ हजारांचा भाव मिळत आहे. कांद्याची बाजारातील आवक पुढील काही दिवस चांगली राहण्याची शक्यता आहे. यामुळे कांद्याच्या भावावरही दबावही कायम राहू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Kharif Price Increase: ‘एल निनो’, रुपया घसरण पथ्यावर पडणार.आंबा आवक वाढलीराज्यातील बाजारात आंब्याची आवक वाढली आहे. आंब्याला सध्या उठावही चांगला आहे. आंब्याला बाजारात सध्या वाणाप्रमाणे दर मिळत आहे. कापूसला सर्वाधिक १५ हजार ते २० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. तर तोतापुरी आंबा सर्वात कमी दीड हजार ते दोन हजार रुपये प्रतिक्विंटलने विकला जात आहे. कलमी आंब्याला ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर लोकल आंबा वाणाप्रमाणे ७ हजारांपासून ते १३ हजारांपर्यंत विकला जात आहे. आंब्याचा भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज जाणकार शेतकरी व्यापारी व्यक्त करत आहेत. .जांभूळ तेजीतबाजारात जांभळाची आवक सुरु झाली आहे. राज्यातील काही बाजारांमध्ये दाखल झालेल्या जांभळाची आवक कमीच आहे. कमी प्रमाणात आवक असल्याने जांभळाला भाव चांगला मिळत आहे. नुकतीच सुरुवात असल्याने जांभळाची चव चाखण्यासाठी मागणीही आहे. सध्या जांभूळ बाजारात गुणवत्तेप्रमाणे १२ हजार ते २७ हजारांच्या दरम्यान विकले जात आहे. मुंबई आणि पुणे मार्केटला जांभळाला २२ हजार आणि २७ हजारांचा भाव मिळाला. तर इतर बाजारांमधील भाव १२ हजार ते १७ हजारांच्या दरम्यान राहीला. बाजारातील आवक पुढील काही आठवड्यांमध्ये वाढण्याची शक्यता आहे. तोपर्यंत दरपातळी काहीशी स्थिरावलेली दिसू शकते, असा अंदाज जांभूळ बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.