Manjara KVK: मांजरा कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जागतिक मधुमक्षिका दिनानिमित्त आयोजित एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात राज्य सरकारचा ‘मधुमित्र’ पुरस्कारप्राप्त ज्ञानेश्वर मलिले यांनी मधुमक्षिका पालन व्यवसायाची माहिती प्रात्यक्षिकासह दिली..कृषी महाविद्यालयातील कीटकशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. विजय भामरे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी चिंतामणी गुट्टे तसेच कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी वरिष्ठ शास्त्रज्ञ संदीप देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती..Women Farmers Training: माडसांगवी येथे महिला शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे धडे.डॉ. भामरे यांनी मधुमक्षिका पालनाचे आधुनिक तंत्रज्ञान, परागीभवनातील महत्त्व तसेच रोजगार व उत्पन्नवाढीच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले. जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी गुट्टे यांनी ग्रामोद्योग विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, अनुदान व शासकीय मदतीची माहिती दिली..Farmer Training Program: प्रात्यक्षिकाधारित प्रशिक्षण कार्यक्रमाला शेतकऱ्यांची पसंती .ज्ञानेश्वर मलिले यांनी आपल्या व्यवसायाची यशोगाथा आणि प्रत्यक्ष अनुभव कथनातून उपस्थित शेतकरी व युवकांना प्रेरित केले. संदीप देशमुख यांनी बदलत्या कृषी परिस्थितीत मधुमक्षिका पालनाची गरज, शेतीपूरक व्यवसाय म्हणून त्याचे महत्त्व तसेच भविष्यातील रोजगाराच्या संधी यावर सखोल मार्गदर्शन केले. प्रा. सतीश बेद्रे यांनी प्रास्ताविक केले..कार्यक्रमास शेतकरी, युवक, महिला बचतगट सदस्य तसेच कृषी क्षेत्रातील विविध घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.