milk Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Adulteration : मराठवाड्यात येणारे भेसळयुक्त दूध रोखा

Dairy Farmer : दूध उत्पादक शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. पशुखाद्य तसेच चारा मजुरी अत्यंत महाग झाली असून दूध उत्पादक शेतकरी तोट्यात व्यवसाय करत आहेत.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यात येणारे भेसळयुक्त दूध रोखा सोबतच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला ६० रुपये प्रतिलिटरचा भाव देण्याची मागणी दूध उत्पादक शेतकरी कृती समितीने केली आहे.

विभागीय उप निबंधक सहकारी संस्था व अन्न औषध प्रशासन उपआयुक्त यांना निवेदन देण्यात आले. मागणी मान्य न झाल्यास सोमवारी (ता. १८) विभागीय उप निबंधक कार्यालय येथे मोफत दूधवाटप करून शेतकरीविरोधी सरकारचा निषेध करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

शेतकरी नेते भाऊसाहेब शेळके पाटील व इंजिनीअर महेश भाई गुजर यांनी हे निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, की दूध उत्पादक शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. पशुखाद्य तसेच चारा मजुरी अत्यंत महाग झाली असून दूध उत्पादक शेतकरी तोट्यात व्यवसाय करत आहेत. शासकीय आकडेवारीनुसार गाईच्या दुधाचा उत्पादन खर्च ५० रुपये प्रतिलिटरपर्यंत गेलेला आहे.

२५ रुपये भावाने डेअरी चालक, दूध संघ हे खरेदी करत आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दूध व्यवसायाकडे वळले आहेत. पण कुंपणाने शेत खाल्ले तर शेतकऱ्यांनी जगायचे कसे? असा प्रश्न आहे. २१ नोव्हेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने ३.२/८.३ दुधाच्या गुणवत्तेला ३४ रुपये भाव देण्यासाठी दूध संघ तसेच खासगी दूध संस्था यांना बंधनकारक करावे.

अन्यथा सर्वांचे परवाने निलंबित करावेत. मागील वर्षी ४२ रुपये दूध खरेदी करून संघचालक ६० ते ८० रुपयांनी विक्री करत होते. आज २५ रुपयांनी घेऊनही दोन वेळेस मलाई काढून ६० ते ८० रुपयांनीच विक्री करत आहेत. त्यामुळे जास्तीचा नफा दूध संस्था शेतकऱ्यांना मारून आपले घबाड भरत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला आहे.

४० लि दुधापासून १ किलो गावरान तूप मिळते. त्याची किंमत ७०० रुपये होते. अधिक ६० रुपये लिटरने जरी तोंड दुधाचा विक्रीचा भाव धरला तरी २४०० रुपये मिळतात. दोन्हीची बेरीज केली असता ३१०० रुपये संस्था कमवून दूध उत्पादक शेतकऱ्यांना फक्त १००० रुपये देतात. रंगराजन समितीचे नियम सांगतात की, एखाद्या कृषी उत्पादनावर प्रक्रिया करून त्याची विक्री होत असेल तर ७० टक्के शेतकऱ्यांना आणि ३० टक्के प्रक्रिया उदोगाला हा नियम आहे.

शेतकऱ्यांच्या दुधाला ६० रुपय दर मिळाला पाहिजे. तूप विक्रीतून संघ, संस्था यांचा नफा मिळत आहे. त्यामुळे दुधाचा पूर्ण भाव शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. तसेच दुधाची भेसळ पश्चिम महाराष्ट्रात जास्त होते. सर्व भेसळयुक्त दूध मराठवाड्यात येत आहे.

त्यासाठी जुने कायगाव, वैजापूर, पैठण येथे चेकपोष्ट लावून बाहेरून येणारे भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपयोजना कराव्यात. अन्यथा आपल्या कार्यालयासमोर दूध उत्पादक शेतकरी तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soyabean Crop Damage: सोयाबीनवर कीटकनाशक फवारलं, सोयाबीन जळालं; केंद्रीय कृषिमंत्र्याचे कारवाईचे आदेश

Satara DCC Bank : सातारा जिल्हा बॅंकेची वार्षिक सभा खेळीमेळीत

Satara ZP Election : सातारा ‘झेडपी’साठी २६ लाख ६६ हजार मतदार

Rain Crop Damage : शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मदत व पुनर्वसन मंत्री जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Crop Loss Compensation : भरपाईप्रश्‍नी जिल्हाधिकारी करणार हस्तक्षेप

SCROLL FOR NEXT